S M L

दीपिकानं पहिल्यांदा रणवीरवरच्या प्रेमाची कशी दिली कबुली?

आतापर्यंत दीपिका काही बोलली नव्हती. पहिल्यांदाच तिनं यावर भाष्य केलंय. ती म्हणालीय, तो माझा आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2018 12:07 PM IST

दीपिकानं पहिल्यांदा रणवीरवरच्या प्रेमाची कशी दिली कबुली?

मुंबई, १८ जून : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या नात्याबद््दल अख्खं जग बोलतंय, पण आतापर्यंत दीपिका काही बोलली नव्हती. पहिल्यांदाच तिनं यावर भाष्य केलंय. ती म्हणालीय, तो माझा आहे.

त्याचं झालं असं की रणवीर सिंगनं सोशल मीडियावर आपला एक फोटो टाकलाय. तो इतका सेक्सी आहे की अनेकांची झोपच उडाली. फॅन्सनी विशेषत: मुलींनी यावर अगदी प्रेमभऱ्या कमेंट केल्यात. इतक्या देखण्या रणवीरसाठी अनेक जणी जीव ओवाळायला तयार आहेत.हे सगळं वाचून दीपिका सरसावली. आणि तिनं कमेंट टाकली 'माईन'. आता उघड उघड  तिनं प्रेमाची कबुलीच देऊन टाकली की हो. शिवाय तिनं सगळ्या फॅन्सना वाॅर्निंगही दिलीय. कुणीही रणवीरकडे प्रेमानं पाहू शकत नाही म्हणून.

रणवीर दीपिकाच्या प्रेमात आकंठ बुडालाय, हे तर त्यानं अनेकदा मीडियासमोर सांगितलंय. दोघं नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आणि तशी तयारीही सुरू आहे.

Loading...

🌊

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 12:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close