'जग्गा जासूस'च्या सेटवर रणबीर आणि कतरिनाची धमाल

या सिनेमातल्या त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा होत आहे. पण या सिनेमाच्या सेटवरही त्यांनी प्रचंड धमाल केलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2017 11:23 AM IST

'जग्गा जासूस'च्या सेटवर रणबीर आणि कतरिनाची धमाल

10जुलै: रणबीर आणि कतरिना ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच एक सिनेमा एकत्र करत आहेत. तो म्हणजे जग्गा जासूस. या सिनेमाचं प्रमोशन ते सगळीकडे एकत्रच करत आहेत. या सिनेमातल्या त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा होत आहे. पण या सिनेमाच्या सेटवरही त्यांनी प्रचंड धमाल केलीय.

जग्गा जासूस या सिनेमातलं 'मुसाफिर' नावाचं गाणं रिलीज झालंय. या गाण्याच्या व्हिडिओत प्रीतम, रणबीर आणि कतरिना सोबत बसलेत. त्यात रणबीर कतरिनाला उशी फेकून मारतोय. कतरिनाही त्यावर एक स्माईल देतेय. दोघंही खूप मस्ती करत आहेत. या सेटवरच्या धमालला जोड आहे त्यांच्या पडद्यावरच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची.

जग्गा जासूस या सिनेमाचं शूटिंग बराच काळ चालू होतं. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लवकरच दोघं एकत्र येऊन फेसबुक लाईव्हही करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 11:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...