मुंबई, 04 जानेवारी : रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या गली बाॅयचं पोस्टर काल रिलीज झालं. आज ( 4 जानेवारी ) त्यांनी टीझर लाँच केलाय.
या टीझरमध्ये सिनेमाचा अंदाज येतोय. यात रणवीर सिंग एका झोपडपट्टीत राहतोय. तो हिप हाॅप गायक आहे. त्यातच त्याला करियर करायचंय. तो रॅप साँग गातोय. सिनेमात आलिया भट्ट आणि कल्की कोचिन आहे.
गली बाॅय बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेलाय. 7 ते 17 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल होणार आहे.
रणवीरनंही गली बाॅयचा फोटो इन्स्टावर पोस्ट केलाय.
सध्या रणवीर सिंग सगळीकडे छा गया म्हणता येईल. त्याचा सिंबा बाॅक्स आॅफिसवर चांगला चालतोय. प्रेक्षक सिनेमाला गर्दी करतायत.
सिद्धार्थ जाधवनं रणवीरसोबता सिंबाचा अनुभव आमच्याशी शेअर केला. सिद्धार्थनं रणवीरला विचारलं तू इतका एनर्जिटिक कसा? त्यावर तो म्हणाला, काम हेच माझं पॅशन आहे. सिद्धार्थ म्हणतो, ' नंतर नंतर आमच्या नाईट्स वाढल्या. एक दिवस मी स्वत: रणवीरला पाहिलंय, तो रात्री डान्स करत होता, सकाळी अॅक्शन, संध्याकाळी इमोशनल सिन आणि पुन्हा रात्री डान्स. कोणालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो.'
सिद्धार्थ सांगतो, ' रणवीरला मी अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलंय. तो जितका धमाल आहे, तितकाच गंभीरही आहे. त्याला मराठी सिनेमाविषयी माहिती आहे. कलाकारांबद्दलही माहिती आहे.'
आलिया आणि रणवीरमुळे गली बाॅयबद्दल अपेक्षा आहेत.