'या' अभिनेत्याच्या घरात साफ-सफाई करायची रानू मंडल; प्रसिद्धीनंतर पूर्वायुष्य उलगडलं

'या' अभिनेत्याच्या घरात साफ-सफाई करायची रानू मंडल; प्रसिद्धीनंतर पूर्वायुष्य उलगडलं

एका व्हायरल व्हिडिओमुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रानू मंडल यांच्याबद्दल आणखी एक वेगळी बातमी आता बाहेर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रानू मंडल यांच्याबद्दल आणखी एक वेगळी बातमी आता बाहेर आली आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावरून रातोरात प्रसिद्ध झालेल्या या गायिकेला स्टेज शो करण्याची संधी मिळाली आणि आता हिंदी चित्रपटासाठी आणि म्युझिक अल्बमसाठी पार्श्वगायन करण्याच्याही ऑफर्स आल्या. प्रसिद्धी मिळाल्यानंतर रानू यांनी आपल्या पूर्वायुष्याबद्दल वेगवेगळ्या मुलाखतींमधून माहिती दिली आहे. चित्रपटसृष्टीशी रानू यांचं नातं जुनं असल्याचं यातून उघड झालं आहे.

गतकाळातले हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार कलाकार फिरोज खान यांच्या घरात त्या घरकाम करत असत, असं रानू यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. फिरोज खान यांच्या घरात स्वयंपाकाचं आणि साफ सफाईचं काम रानू करत असे. फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानलाही आपण सांभाळल्याचं त्या सांगतात. आणि फरदीनचे काका संजय खान यांच्या घराची देखभालही केली असल्याचं रानू मंडल यांनी सांगितलं.

रेल्वे स्टेशनवर गाणं गात आता बॉलिवूडची स्टार बनलेल्या रानू मंडल यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आज घडीला रानू यांना ओळखत नाही असं क्वचितच कोणीतरी असेल हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. सध्या त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, सध्या रानू एका मागोमाग एक शोमध्ये हजेरी लावत आहेत आणि प्रत्येक शोमध्ये त्यांच्या आवाजानं उपस्थितांना मुग्ध करत आहेत. नुकताच रानू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रानू एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करताना दिसत आहेत.

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.

संबंधित - ज्याचं गाणं गात रानू झाली सुपरस्टार, 'तो' रिअल हिरो मात्र राहिला दुर्लक्षित

सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.

रानू सांगतात, ‘मी रेल्वे स्टेशनवर यासाठी गात असे, कारण माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं आणि मी गाणं गाऊन माझं पोट भरत असे. कोणी मला बिस्किट देत असे तर कोणी पैसे.’ रानाघाटवर जेव्हा रानू यांनी गाणं गायला सुरुवात केली. तेव्हा काही लोकांनी त्यांचे व्हिडीओ शूट केले. इथे-तिथे शेअर केले. त्यानंतर अनेकांना त्यांच्या गाण्यात लताजींची झलक दिसली. हे असंच चालू राहिलं मात्र त्याचं गाणं काही लोकांमध्येच राहिलं होतं.

31 Golden Years Of Salman Khan : भाईजानचे असे फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 08:56 PM IST

ताज्या बातम्या