रानू मंडलचा मेकओव्हर PHOTO VIRAL, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रानू मंडलचा मेकओव्हर PHOTO VIRAL, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सध्या रानू मंडल यांच्या मेकअपमधील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : ‘एक प्यार का नगमा है’ या लता दीदींच्या गाण्यामुळे अचानक प्रसिद्धिच्या झोतात आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पण यावेळी त्यांच्या कोणत्याही नव्या गाण्यामुळे नाही तर त्या चर्चेत आल्यात त्यांच्या नव्या मेकओव्हरमुळे. सध्या रानू मंडल यांच्या मेकअपमधील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी मेकअपसेबत बरेच दागिने सुद्धा घातले आहेत. पण या मेकअप आणि दागिन्यांमुळेच रानू मंडल सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रानू मंडल यांचा खूपच जास्त मेकअप केलेला हा फोटो एका ब्यूटी इव्हेंटमधील असल्याचं बोललं जात आहे. या फोटोमध्ये रानू यांनी डिझायनर कपडे घातले आहेत. याशिवाय यामध्ये त्यांचा मेकअप सुद्धा खूप जास्त केला आहे.

रानू यांच्या हा अवतार पाहून अनेकजण सोशल मीडियावर रानू मंडल यांची खिल्ली उडवत आहेत. खास करुन ट्विटरवर त्याच्या या लुकवर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. याशिवाय त्यांच्या सोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमिया आणि त्यांच्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.

...आणि हॉटेलच्या खिडकीतून उतरली विद्या बालन Video व्हायरल

काही लोकांनी म्हटलं आहे की, रानू मंडल यांच्या मेकअप आर्टिस्टला 2020चा ऑस्कर अवॉर्ड मिळणार आहे. रानू यांचा मेकअप त्यांच्या स्किन कलरपेक्षा खूप जास्त लाइट आहे.

रानू मंडल फार कमी वेळात सोशल मीडिया सेंसेशन बनल्या आहेत. त्यांनी बॉलिवूडसाठी हिमेश रेशमियाच्या एका सिनेमात गाणं गायलं आहे. याशिवाय काही रिअलिटी शोमध्ये त्यांना गेस्ट म्हणूनही बोलवण्यात आलं होतं. याशिवाय काही पब्लिक इव्हेंटमध्येही त्या दिसल्या होत्या.

कपिल शर्माने केला खुलासा, 'या' कारणामुळे सोडला नवज्योतसिंग सिध्दूने शो

काही दिवसांपूर्वी रानू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्या त्यांच्या चाहतीवर ओरडताना दिसल्या होत्या. ज्यामुळे चाहते त्यांच्यावर भडकलेले दिसले. याचीच कमी म्हणून की काय रानू मंडल पत्रकारांच्या प्रश्नांनाही टाळताना दिसल्या. यानंतरही त्याच्यावर मीम्स व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा नवा लुक पाहिल्यावर नेटकरी सैराट झालेले पाहायला मिळत आहेत.

या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय नवीन महागडी कार

=========================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 18, 2019, 9:05 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading