ती सध्या काय करते? Viral Video मुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल आता आहेत तरी कुठे

ती सध्या काय करते? Viral Video मुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल आता आहेत तरी कुठे

रानू मंडल या सध्या सोशल मीडियावर कुठेच दिसत नसल्यानं त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर : पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेच्या विषय बनल्या होत्या. सुरुवातीला लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं आपल्या सिनेमात गाणं गाण्याची संधी रानू यांना दिली होती. ज्यामुळे त्यांची सगळीकडेच खूप चर्चा झाली मात्र काही दिवसांपासून त्या अचानक कुठे गायब झाल्या आहेत.

रानू मंडल या सध्या सोशल मीडियावर कुठेच दिसत नसल्यानं त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की रानू मंडल या सध्या प्रचंड काम करत आहेत. त्यांचं ऑफिशियल फेसबुक पेज नुकतंच तयार करण्यात आलं असून त्यावरुन त्यांचा कामविषयीचे अपडेट शेअर केले जात आहेत.

लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

याशिवाय रानू यांच्या बायोपिकचं सुद्धा काम सुरू असून त्यामुळे रानू सध्या त्यांच्या कामात बीझी आहेत. दरम्यान आपलं अर्ध्याहून जास्त आयुष्य कष्टात घलवणाऱ्या रानू यांना नुकताच त्यांचा पासपोर्ट मिळाला आहे.

...म्हणून सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम करणं केलं बंद

एवढंच नाही तर त्यांचं फेसबुक पेज 2 लाखांहून जास्त लोकांनी लाइक केलं आहे. रानू मंडल यांच्या यशात महत्त्वाचा वाटा असलेला एतींद्र चक्रवर्ती त्यांचं फेसबुक पेज हॅन्डल करत असून तो फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रानू यांचे अपडेट्स त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो.

रानू मंडल यांची सध्या कामानिमित्त खूपच धावपळ होत आहे. अद्याप त्या पश्चिम बंगालमधील त्यांच्या घरी राहत आहेत आणि त्यांच्याकडे सध्या बॉलिवूडची काही गाणी सुद्धा आहेत त्यामुळे पश्चिम बंगाल ते मुंबई असा त्यांचा सततचा प्रवास सुरू असतो.  हिमेश रेशमियाचा सिनेमा 'हॅप्पी हार्डी अँड हीर'चं 'तेरी मेरी कहानी' हे रानू मंडल यांनी गायलेलं गाणं रिलीज झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं खूप कौतुक झालं होतं.

बलात्काराच्या आरोपाखाली दिग्दर्शकाला अटक, अनेक महिन्यांपासून करत होता 'हे' काम

===================================================

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

Published by: Megha Jethe
First published: October 20, 2019, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading