रानू मंडल यांनी हिंदीनंतर गायलं थेट मल्याळम गाणं, VIDEO VIRAL

रानू मंडल यांनी हिंदीनंतर गायलं थेट मल्याळम गाणं, VIDEO VIRAL

रानू मंडल यांच्या मल्याळम गाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशझोतात आलेली सिंगर रानू मंडल मागच्या काही दिवसांपासून एका चाहतीवर रागवल्यानं चर्चेत आली आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. एवढंच नाही तर बॉलिवूडचा स्टार प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानंही त्यांना त्याच्या सिनेमात गाण्याची संधी देऊ केली. त्यानंतर त्यांना आता अनेक शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावलं जात आहे. अशाच एका शोमध्ये रानू यांनी आता हिंदी नाही तर मल्याळम गाणं गायलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रानू मंडल यांनी गेस्ट म्हणून एका मल्याळम कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहासाठी एक मल्याळम गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला. त्यांचं हे पेज त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांना प्रसिद्धी मिळवून देणारा एतींद्र चक्रवर्ती चालवतो. रानू मंडल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'मजा डबल करने आ रही हूँ', सनी लिओनीने शेअर केला VIDEO

 

View this post on Instagram

 

#welcome @ranumondal.offical #asianet #asianetnews #love #support #india#comedystars

A post shared by Ranu Mondal⏺️ (@ranumondal.offical) on

रानू मंडल यांच्याबद्दल बोलायचं तर रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. याशिवाय याच सिनेमासाठी त्यांनी आणखी दोन गाणी गायली आहेत.

Tanhaji सिनेमाच्या अभिनेत्रीचे बिकिनीतील BOLD PHOTO सोशल मीडियावर VIRAL

 

View this post on Instagram

 

#india #love #support #ranumondal#ranumondalsong #pakistan #indonesia #afghanistan #instagram #tiktok

A post shared by Ranu Mondal⏺️ (@ranumondal.offical) on

आपल्या गाण्याविषयी रानू सांगतात, 'गाण्यासाठी मी कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओ किंवा टेपवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मी गाणं शिकले आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करु लागले.' तरुण वयात रानू क्लबमध्ये गात असत पण पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या सासरच्या विरोधामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं.

Oops Moment : पॉप सिंगरचा लाइव्ह कॉनसर्टमधील VIDEO VIRAL

====================================================

Published by: Megha Jethe
First published: November 28, 2019, 11:36 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading