आईच्या प्रसिद्धीचा मॅनेजर्स गैरफायदा घेत आहेत, रानू मंडल यांच्या मुलीचा गंभीर आरोप

रानू यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलीनं काही दिवस त्यांची काळजी घेतली होती मात्र नंतर मागच्या 10 वर्षांपासून तिनं रानू यांच्याशी नातं तोडलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 06:01 PM IST

आईच्या प्रसिद्धीचा मॅनेजर्स गैरफायदा घेत आहेत, रानू मंडल यांच्या मुलीचा गंभीर आरोप

मंबई, 06 सप्टेंबर : सोशल मीडिया स्टार रानू मंडल सध्या तिच्या जादुई आवाजामुळे सगळीकडे चर्चेत आहे. आज रानू मंडल यांना ओळखत नाही असं कोणीही नाही. त्यांनी प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियासाठी एक-दोन नाही तर तब्बल तीन गाणी रेकॉर्ड केली. रानाघाट सारख्या छोट्याशा गावात भीक मागत आपली उपजिविका करणाऱ्या रानू याचा बॉलिवूड पर्यंतचा प्रवास खरंच स्वप्नवत असा होता. काही दिवसांपूर्वी रानू यांना सलमान खाननं महागडं घर भेट दिल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याची कबुली स्वतः रानू यांनी दिली. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या मुलीनं त्यांचे मॅनेजर एतींद्र चक्रवर्ती आपल्या आईच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आहे.

सध्या सोशल मीडियात चर्चा असलेल्या गायिका रानू मंडल यांच्या प्रसिद्धीचा त्यांचे मॅनेजर गैरफायदा घेत असल्याचा आरोप रानू यांची मुलगी एलिझाबेथ रॉयनं केला आहे. हे दोन्ही मॅनेजर आपल्याला आईला भेटू देत नाहीत, असंही तिनं म्हटलं आहे. मॅनेजर एतींद्र आणि तपन हे दोघेही आईकडून गरजेचं सामान आणण्याच्या नावाखाली पैसे उकळत आहेत. आईकडे असलेल्या ५० हजारांपैकी १० हजार रुपयांत त्यांनी तिला केवळ एक बॅग आणि काही आवश्यक वस्तू आणून दिल्या आहेत, असा आरोप एलिझाबेथने केला आहे. तसेच हे दोन्ही मॅनेजर मला आईला भेटू देत नाहीत, आईशी संपर्क साधल्यास तुझे हातपाय तोडले जातील अशी धमकी त्यांनी मला दिल्याचंही तिनं म्हटलं आहे.

रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या बदललेल्या रूपामागचं 'हे' आहे रहस्य

मात्र, मुलगी एलिझाबेथचे आरोप स्वतः रानू मंडल यांनी फेटाळले असून एतींद्र आणि तपन आपली चांगली काळजी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या मुलीकडून कोणीतरी हे मुद्दाम बोलून घेत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एतींद्र आणि तपन यांनीही एलिबेथचे आरोप फेटाळून लावले आहेत. तिने आमच्यावर लावलेले आरोप खोटे असून ती आमची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकी वर्षे आईल रेल्वे स्टेशनवर सोडून देणाऱ्या एलिझाबेथला आजच आईची आठवण कशी आली असा सवालही त्यांनी केला आहे. आईला उदरनिर्वाहासाठी एलिझाबेथ केवळ 200 ते 500 रुपये पाठवायची असं या दोन्ही मॅनेजर्सचं म्हणणं आहे.

Loading...

'History'वर 'महाकालेश्वर-लीजण्ड ऑफ शिवा'मध्ये इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहत. तिथल्या रेल्वे स्टेशनवर त्या गाणं गाऊन आपलं पोट भरत असत पण त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काही दिवसातच त्यांचं आयुष्य बदललं.

अंबानींच्या गणेश पूजेला प्रियांकाच्या भावासोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल कोण?

==============================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...