रानू मंडल यांचा पहिला-वहिला स्टेज शो गाजला, पाहा VIDEO

रानू मंडल यांचा पहिला-वहिला स्टेज शो गाजला, पाहा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू एका स्टेज शोमध्ये गाताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : रेल्वे स्टेशनवर गाणं गात आता बॉलिवूडची स्टार बनलेल्या रानू मंडल यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आज घडीला रानू यांना ओळखत नाही असं क्वचितच कोणीतरी असेल हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. सध्या त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, सध्या रानू एका मागोमाग एक शोमध्ये हजेरी लावत आहेत आणि प्रत्येक शोमध्ये त्यांच्या आवाजानं उपस्थितांना मुग्ध करत आहेत. नुकताच रानू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात रानू एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू एका स्टेज शोमध्ये गाताना दिसत आहेत. प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या त्या हॉमध्ये रानू यांचा मधुर आवाज घुमत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर रानू यांना एखाद्या इव्हेंटमध्ये बोलवलं असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ रानू यांच्या एका फॅनेपजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हा रानू यांचा पहिला स्टेज शो असल्याचं सांगण्यात आलं आहे. जो पश्चिम बंगालच्या नवद्वीपमध्ये आयोजित करण्यात आला होता.

प्रसिद्ध अभिनेत्रीला रुममेटनं केली बेदम मारहाण, काचेच्या ग्लासनं चेहरा केला खराब

 

View this post on Instagram

 

1st time performing on stage at Nabadwip.

A post shared by Renu Mondal Teem (@ranumondal_teem) on

या व्हिडीओमधील खास गोष्ट ही आहे की, स्टेजवर तिच्यासोबत असलेली व्यक्ती म्हणजे एतींद्र चक्रवर्ती आहे. ज्यानं रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यानंतर त्या लोकप्रिय झाल्या. एतींद्र यानंच रानू यांना हेमेश रेशमियाकडे घेऊन गेला होता. रानू यांच्या प्रसिद्धीमध्ये एतींद्र याची सर्वात मोठी भूमिका आहे. रानू यांना पाहिल्यावर असं अजिबात वाटत नाही की त्या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या समुदायासमोर परफॉर्म करत आहेत. त्या स्टेजवरही त्यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गायलं.

निकसोबत राहण्यासाठी प्रियांकाची धडपड, छेडछाड केलेला PHOTO VIRAL

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.

सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.

ज्याचं गाणं गात रानू झाली सुपरस्टार, 'तो' रिअल हिरो मात्र राहिला दुर्लक्षित

रानू सांगतात, ‘मी रेल्वे स्टेशनवर यासाठी गात असे, कारण माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं आणि मी गाणं गाऊन माझं पोट भरत असे. कोणी मला बिस्किट देत असे तर कोणी पैसे.’ रानाघाटवर जेव्हा रानू यांनी गाणं गायला सुरुवात केली. तेव्हा काही लोकांनी त्यांचे व्हिडीओ शूट केले. इथे-तिथे शेअर केले. त्यानंतर अनेकांना त्यांच्या गाण्यात लताजींची झलक दिसली. हे असंच चालू राहिलं मात्र त्याचं गाणं काही लोकांमध्येच राहिलं होतं.

याच दरम्यान काही लोकांनी त्यांना मोठ्या समारंभात गाण्यासाठी बोलवायला सुरुवात केली. मात्र रानू यांना नियमित पैसे आणि खाण्याच्या वस्तू रेल्वे स्टेशनवरुनच मिळत असत. त्यामुळे त्या पुन्हा रेल्वेस्टेशनवर परतत असतं.

रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं प्यार का नगमा व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

 

View this post on Instagram

 

#Repost @realhimesh Recorded teri meri kahani @realhimesh new song from happy hardy and heer thanks for all your love and support

A post shared by Renu Mondal Teem (@ranumondal_teem) on

रानू यांचे  व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.

=========================================================================

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

First published: August 29, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading