मुंबई, 30 ऑक्टोबर : तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्याच्या जोरावर तुम्ही कुठून कुठे पोहोचू शकता याचं जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे स्टेशन आणि रस्त्यांवर गाणं गात भीक मागून त्यावर आपली उपजिविका करणाऱ्या रानू मंडल सध्या सोशल मीडिया व्हायरल सिंगर झाल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांनी नुकताच प्लेबॅक सिंगर म्हणून बॉलिवूड डेब्यू केला असून त्यांचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानी' रिलीज झालं. या गाण्याला सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण नुकताच रानू यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचं हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला त्यांंच्या पहिल्या गाण्याचाही विसर पडेल.
सध्या रानू यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ त्यावेळचा आहे. ज्यावेळी त्या स्टार सुद्धा झाल्या नव्हत्या. या व्हिडीओमध्ये रानू 1985 मध्ये रिलीज झालेला सिनेमा 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमातील 'एक राधा एक मीरा' हे गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या खूपच साध्या वेषात दिसत आहेत. त्यावर अंदाज लावला जाऊ शकतो की हा व्हिडीओ रानू रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागत असत त्यावेळचा आहे. या व्हिडीओमध्ये त्या त्यांच्या पहिल्या व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या तशाच दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
...आणि सैफ अली खान चक्क स्वतःच्याच घरचा पत्ता विसरला!
रानू मंडल यांच्याबद्दल बोलायचं तर रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. रानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक 'आदत' नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'आदत'नंतर रानू मंडल हिमेशसोबत 'आशिकी में तेरी...' साठी सुद्धा काम करणार आहे.
मिसेस मुख्यमंत्री : लग्नात सुमीनं समरला दिलं 'हे' सरप्राइझ गिफ्ट
आपल्या गाण्याविषयी रानू सांगतात, 'गाण्यासाठी मी कोणतही शिक्षण घेतलेलं नाही. रेडिओ किंवा टेपवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मी गाणं शिकले आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करु लागले.' तरुण वयात रानू क्लबमध्ये गात असत पण पुढे लग्न झाल्यावर त्यांच्या सासरच्या विरोधामुळे त्यांना गाणं सोडावं लागलं.
कुमार सानूंनी व्यक्त केली रानू यांच्या सोबत काम करण्याची इच्छा
प्रसिद्ध सिंगर कुमार सानू यांनी नुकतंच एका कार्यक्रमात रानू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्याच एका म्युझिक अल्बम लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांना रानू यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कुमार सानू यांनी रानू मंडल यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'जर कोणी नवा गायक या इंडस्ट्रीमध्ये येत असेल तर आम्हाला आनंदच वाटतो. रानू खूपच चांगलं काम करतील तर त्यांना चांगली ओळख मिळेल. जर मला त्याच्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव मिळाला तर मी नक्कीच त्यांच्यासोबत काम करेन. हिमेशनं त्यांना त्याच्या सिनेमासाठी काम करण्याची संधी दिल्याचं मी ऐकलं आहे. मात्र त्यांचं गाणं अद्याप ऐकलेलं नाही. येणाऱ्या काळात त्या कसं काम करतात ते पाहूयात.'
'एक प्यार का नगमा है'मुळे झाल्या स्टार
आपल्या जादुई आवाजानं सर्वांना वेड लावणाऱ्या रानू मूळच्या पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणाऱ्या आहेत.रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला.
शादी के साइड इफेक्ट! दीपवीरचा IIFA लुक पाहून तुम्हीही लावाल कपाळाला हात
त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला एतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यांनी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.
============================================================
VIDEO : 'सगळे सण एकत्र आले', खिचडीवाल्या 'करोडपती' बबिता ताडेंशी खास बातचीत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा