VIDEO : रस्त्यावर गाणं गात स्टार झालेल्या रानू यांच्या जादुई आवाजाचा दुसरा धमाका!

VIDEO : रस्त्यावर गाणं गात स्टार झालेल्या रानू यांच्या जादुई आवाजाचा दुसरा धमाका!

सध्या सर्वत्र रानू मंडल यांचीच चर्चा असून त्यांच्या आवाजानं लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यांचं हे नवं गाणंही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : कोणाचं नशीब कधी आणि कसं पलटेल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाणं गात भीक मागणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसातच या महिलेचं आयुष्य एवढं बदललं की आता या महिलेला बॉलिवूडसाठी गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. एका माणसानं त्याच्या फेसबुक अकाउंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो खूप व्हायरल झाला आणि ही महिला रातोरात स्टार झाली. या महिलेचं नाव होतं रानू मंडल. त्यानंतर त्यांचा मेकओव्हरही करण्यात आला.

आता रानू बॉलिवूडसाठी गाणार असून प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आहे. त्यांच्या या गण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतानाच रानूंच्या आणखी एका नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रानू 'डफली वाले...' हे गाणं गाताना दिसत आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला अनेक माणसं त्यांचं गाणं ऐकताना दिसत आहे. सध्या सर्वत्र रानू मंडल यांचीच चर्चा असून त्यांच्या आवाजानं लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यांचं हे नवं गाणंही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

VIDEO : मुलगा की मुलगी? बाळाच्या जन्माआधीच अ‍ॅमी जॅक्शननं केला खुलासा

आपल्या मधुर आवाजानं सर्वांना मुग्ध करणाऱ्या रानू यांनी हिमेशच्या आगामी हॅपी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. नुकतीच या गाण्याची एक झलक समोर आली होती. आता रानू यांना या गाण्यासाठी किती रुपये मिळाले असतील असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. असं म्हटलं जातं की, रानू यांना या एका गाण्यासाठी जवळपास सहा ते सात लाख रुपये मिळाले. विशेष म्हणजे रानू हे मानधन घेत नव्हत्या.

सलमान खानची मागणी भन्साळींना नामंजूर, ‘इन्शाअल्लाह’मधून दबंगचं बॅकआउट?

मीडिया रिपोर्टनुसार, रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्याचे पैसे घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर हिमेशने त्यांना जबरदस्ती पैसे देऊ केले. एवढंच नाही तर हिमेश म्हणाला की, ‘तुम्हाला बॉलिवूडचा स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.’ याशिवाय नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, तो त्याच्या आगामी सिनेमात रानू यांना गाण्याची संधी देईल. याशिवाय अक्षय कुमारच्या सिनेमासाठीही त्या एक गाणं गाणार आहेत.

रानू काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनजवळ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाताना दिसल्या होत्या. एका व्यक्तीनं त्यांचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाल्या. या एका व्हिडीओनं त्यांचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. याबाबत बोलताना रानू सांगतात, 'हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी त्याला अधिकाधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन.' रानू यांना आतापर्यंत अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीशी झालेली भेट हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून आपल्या मुलीपासून दूर गेलेल्या रानू यांना त्यांची मुलगी परत मिळाली.

'गद्दारी तो आपने सिखाई नहीं', पाहा ऋतिक-टायगरचा अ‍ॅक्शनपॅक War Trailer

=================================================================

ग्रँड फिनालेपूर्वी Bigg Boss Marathi 2मध्ये रंगली पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या