रानू मंडल यांना दोनदा करावं लागलं होतं लग्न, कारण...

रानू मंडल यांना दोनदा करावं लागलं होतं लग्न, कारण...

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांच्या बद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकताच त्यांच्या लग्नाबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : कधी रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात बसून तर कधी गल्ल्यांमध्ये फिरून ती लता मंगेशकर यांची गाणी गात असे. लोक तिचं गाणं ऐकत असत आणि त्याबदल्यात तिला पैसे किंवा मग खाण्याच्या वस्तू देत असत. त्यावर ती आपलं पोट भरत असे. ही कहानी आहे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या रानू मंडल यांची. आता त्यांनी बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून डेब्यू केला आहे. त्यामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांच्या बद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल अनेक वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. नुकताच त्यांच्या लग्नाबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार रानू मंडल यांची 2 लग्न झाली होती. त्यांचा पहिला नवरा हा पश्चिम बंगालमध्येच राहणारा होता. मात्र रानू यांना तो काही जास्त महत्त्व देत नसे. वयाच्या 20 व्या वर्षापासून रानू क्लबमध्ये गाणं गात असत. त्यावेळी त्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, त्यांची हीच गोष्ट त्यांच्या सासरच्या लोकांना खटकू लागली आणि परिणामी नवरा-बायकोमध्ये वाद वाढत जाऊन त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. अखेर रानू यांच्या नवऱ्यानं त्यांना सोडून दिलं.

('या' अभिनेत्याच्या घरात कामवाली बाई होती रानू मंडल)

रानू यांना त्याच्या पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्न तुटल्यानंतर रानू पूर्णपणे खचल्या त्यांनी गाणं बंद केलं आणि त्या 2000 च्या सुमारास मुंबईमध्ये आल्या. मुंबईमध्ये त्या फिरोज खान यांच्या घरी घरकाम करत असत. त्याचवेळी त्यांची ओळख बबलू मंडल यांच्याशी झाली. बबलू हे बंगलमधीलच होते. काही दिवसात या दोघांनीही लग्न केलं.

(अजय देवगणनं खरेदी केली नवी लक्झरी कार, देशात फक्त 2 व्यक्तींकडे आहे ही गाडी!)

रानू यांचा दुसरा नवरा बबलू मंडल हॉटेलमध्ये काम करत असे. मात्र दुर्दैवानं 2003 मध्ये त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं आणि त्यानंतर त्या या दुःखातून सावरू शकल्या नाहीत. काही दिवसातच त्या पुन्हा बंगलमध्ये परतल्या. बंगालमध्ये परतल्यावर त्यांना उत्पन्नाचं कोणतंही साधन नसल्यानं त्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गात लोक देतील ते पैसे आणि खाण्याचे पदार्थ यावर स्वतःचं पोट भरू लागल्या. त्यांचा आवाज असा होता की ऐकणारा मुग्ध होऊन जाईल.

(The Zoya Factor : इंडियन क्रिकेट टीमसाठी सोनम ठरणार का लकी चार्म? पाहा Trailer)

जवळपास 10 वर्ष हे सर्व असचं सुरू होतं. मात्र एक दिवस रानाघाट रेल्वे स्टेशनवर सॉफ्टवेअर इंडिनिअर एतींद्र चक्रवर्ती या तरुणाचं लक्ष त्यांचा गाण्याकडे गेलं त्यांच्या आवाजानं मुग्ध झालेल्या एतींद्रने त्यांचा एक व्हिडिओ शूट करुन आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला. काही काळातच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एका रात्रीत राणू प्रकाशझोतात आल्या. आता त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजानं स्वतःचा असा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

==========================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 09:46 AM IST

ताज्या बातम्या