नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या राणूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं

नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या राणूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं

प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं तिला पहिला ब्रेक दिला आहे. तिच्या या गण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : कोणाचं नशीब कधी आणि कसं पलटेल याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाणं गात भीक मागणाऱ्या एका व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसातच या महिलेचं आयुष्य एवढं बदललं की आता या महिलेला बॉलिवूडसाठी गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. एका माणसानं त्याच्या फेसबुक अकाउंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो खूप व्हायरल झाला आणि ही महिला रातोरात स्टार झाली. या महिलेचं नाव होतं रानू मंडल. त्यानंतर तिचा मेकओव्हरही करण्यात आला. आता ही महिला बॉलिवूडसाठी गाणार असून प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं तिला पहिला ब्रेक दिला आहे. तिच्या या गण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

गायक हिमेश रेशमियानं त्याच्या आगामी सिनेमातील गाणं रानू मंडलला ऑफर केलं आहे. नुकताच हिमेशनं तिच्या गाण्याचा हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रानू तिच्या जादुई आवाजात नवीन गाणं गाताना दिसत आहे. तिच्या बाजूलाच हिमेश तिचं गाणं ऐकत उभा असलेला पाहायला मिळत आहे. तर रानू सुद्धा हिमेश तिचं गाणं एंजॉय करताना पाहून हसताना दिसत आहे. हिमेशनं या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं माझा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हीर’ यातील असून हे गाणं रानूनं गायलं आहे.’

वाचा : सोनम कपूरने धारण केलेल्या 'या' नव्या अवतारानं उत्सुकता वाढली

याशिवाय राणू ‘सुपरस्टार सिंगर’ नावाच्या एका नव्या रिअलिटी शोमध्येही दिसणार आहे. ती या शोमध्ये हिमेश आणि परिक्षकांसोबतच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना भेटणार आहे. हिमेश रानूवर खूपच इम्प्रेस झाला असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘सलमान खानचे वडील सलीम अंकल यांनी मला सांगितलं होतं की, तुला लाइफमध्ये कधी जर एखादी टॅलेंटेड व्यक्ती भेटली तर त्या व्यक्तीला जाऊ देऊ नकोस.’

वाचा : ज्या हीरोबरोबर लहानपणी फोटो काढून घेतला, त्याचीच नायिका होणार ही मराठमोळी मुलगी

रानू काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनजवळ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाताना दिसली होती. एका व्यक्तीनं तिचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली. या एका व्हिडीओनं तिचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. याबाबत बोलताना रानू सांगते, हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी त्याला अधिकाधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. रानूला आतापर्यंत अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र तिच्यासोठी तिच्या मुलीशी झालेली भेट हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून आपल्या मुलीपासून दूर गेलेल्या रानूला तिची मुलगी परत मिळाली.

वाचा : आमिर खानच्या मुलीने शेअर केला हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा

=============================================================================

खासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून संवाद दौरा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

First published: August 23, 2019, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading