मुंबई, 05 सप्टेंबर : सोशल मीडिया स्टार रानू मंडल सध्या तिच्या जादुई आवाजामुळे सगळीकडे चर्चेत आहे. आज रानू मंडल यांना ओळखत नाही असं कोणीही नाही. त्यांनी प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियासाठी एक-दोन नाही तर तब्बल तीन गाणी रेकॉर्ड केली. रानाघाट सारख्या छोट्याशा गावात भीक मागत आपली उपजिविका करणाऱ्या रानू याचा बॉलिवूड पर्यंतचा प्रवास खरंच स्वप्नवत असा होता. अनेकांनी त्याच्या पदार्पणावर प्रतिक्रिया दिली त्यानंतर काही दिवसांपूर्वीच गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
'एक प्यार का नगमा है' हे लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांचं गाणं रेल्वेस्टेशनवर गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि Ranu mondal अचानक प्रकाशझोतात आल्या. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे आज बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर झाल्या. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा असाच आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं.
बाबो! एक गरम चाय की प्याली तब्बल 78 हजारांची, अभिनेत्यानं शेअर केलं बिल
गानसम्रात्रज्ञी लतादीदी यांना रानू मंडलबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधीने केला. त्यावर नव्वदीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या लता मंगेशकर म्हणाल्या, "माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असतं."
कुठलीही आणि कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं, अशी प्रतिक्रिया लता दिदींनी दिली होती. मात्र लता दीदींचा हा अंदाज लोकांना आवडला नाही आणि त्यांनी लता दीदींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Throw back या फोटोतली अभिनेत्री तुम्हाला तरी ओळखता येईल का? आता आहे एकदम slim
एका युजरनं लिहिलं, जेव्हा लता मंगेशकर त्यांच्या प्रसिद्धीच्या काळात होत्या त्यावेळी त्यांनी अनेक फिमेल सिंगर्सचं करिअर धोक्यात आणलं होतं. त्यामुळे त्यांनी आतातरी कोणाला प्रोत्साहन द्यायला हवं. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, मी रानू मंडलबाबत तुमचा क्रिटीसिझम आणि निंदनिय प्रतिक्रियेवर ससन्मान तुमच्याशी सहमत नाही. खरं तर तुम्हा रानूला पाठिंबा द्यायला हवा होता. रानू यांच्याकडे गमावण्यासारखं असं काहीच नाही. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेची चिंता कोणीही करत नाही. तुमच्यासाठी कठोर शब्द वापरल्याबद्दल माफी असावी. या व्यतिरिक्तही रानू यांच्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरनं तर लता मंगेशकर यांना रानूंचा तिरस्कार वाटत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र यावर स्वतः रानू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.
गणपतीसमोरच्या या फोटोमुळे अजूनही ट्रोल होतेय सारा अली खान
रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.
आलिया भट आणि रणबीर कपूरचं लग्न? VIRAL PHOTOचं हे आहे सत्य
===============================================
VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक