रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

नुकतीच गूगलनं 2019 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 गाण्यांची लिस्ट प्रसिद्ध केली.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : इंटरनेट सेंनसेशनपासून बॉलिवूड सिंगर झालेल्या रानू मंडल प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं चर्चेत असतात. रेल्वे स्टेशनवर बसून लता मंगेशकर यांचं गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांनी अशाप्रकारे लोकांची मनं जिंकली की लोक त्यांचे अक्षरशः दीवाने झाले होते. यामुळेच आज पुन्हा एकदा रानू मंडल यांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. रानू मंडल यांना माहितही नसेल की लोकांकडून त्यांना किती प्रेम मिळालं आहे. पण याचा अंदाज गूगलनं (Google Search 2019) मात्र लावला आहे.

नुकतीच गूगलनं 2019 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या गाण्यांची टॉप 10 लिस्ट प्रसिद्ध केली. यात आश्चर्याची बाब म्हणजे यात रानू मंडल यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाखो लोकांनी त्यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गूगलवर सर्च केलं. गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गाण्यांमध्ये त्यांचं हे गाणं दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच गाण्यातून रानू मंडल यांनी बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून पदार्पण केलं होतं. हे गाणं तुफान गाजलं त्याची चर्चाही झाली मात्र हे पहिलं स्थान पटकावण्यात अयशस्वी ठरलं.

मलायकाशी घटस्फोट, गर्लफ्रेंड जॉर्जियाशी दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर भडकला अरबाज!

गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 गाण्यांमध्ये पहिल्या स्थानवर 'ले फोटो ले' हे राजस्थानी गाणं आहे. जे सिंगर नीलू रंगीलीनं गायलं आहे आणि या गाण्यावर गोरी नागोरीनं परफॉर्म केलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’, तिसऱ्या क्रमांकावर ‘तेरी प्यारी प्यारी दो अंखियां’, चौथ्या क्रमांकावर ‘वास्ते’, पाचव्या क्रमांकावर 'कोका-कोला तू', सहाव्या क्रमांकावर 'गोरी तेरी चुनरी बा लाल लाल रे' सातव्या क्रमांकावर 'पल-पल दिल के पास' आठव्या क्रमांकावर 'लड़की आंख मारे', नवव्या क्रमांकावर 'पायलिया बजनी लाडो पिया' तर दहाव्या क्रमांकावर 'क्या बात है' हे गाणं आहे.

रानू मंडल या सुरुवातीला राणाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणी गात असे आणि त्यातून मिळाणाऱ्या पैशावर पोट भरत असे. त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती या तरुणानं तिचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामुळे त्या रातोरात स्टार झाल्या. त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला आणि त्यांनी प्रसिद्धा प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’साठी तीन गाणी गायली.

मराठमोळ्या स्मिता पाटील यांनी बदलला बॉलिवूड सिनेमांचा चेहरा!

दीपिकानं सांगितलं गुपित, धोनी नाही तर ‘हा’ आहे आवडता क्रिकेटपटू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Dec 13, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या