रिलीज होताच रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या नव्या 'रिमिक्स'ने केली धम्माल!

रिलीज होताच रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या नव्या 'रिमिक्स'ने केली धम्माल!

रानू मंडल आणि हिमेश रेशमीयाची केमेस्ट्री याही गाण्यात दिसून आलीय. जुन्या गाण्यासारखचं हे गाणंही ठरणार हिट

  • Share this:

मुंबई 15 नोव्हेंबर : हिमेश रेशमियाचं (Himesh Reshammiya)  'आशिकी मैं तेरी' (Ashiqui Mein Teri ) हे गाणं कधीकाळी  ब्‍लॉकबस्‍टर ठरलं होतं. आता हिमेश ने रानू मंडल (Ranu Mondal) सोबत या गाण्याचं रिमिक्स तयार केलंय. 'आशिकी मैं तेरी 2.0'चं हे गाणं आज रिलीज झालंय. हे गाणं रिलीज झाल्या झाल्याचं प्रेक्षकांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिलाय. हिमेश सोबतचं रानू मंडलचं हे गाणंही हिट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. टिप्‍स ने हे गाणं रिलीज केलं असून गुरुवारी या गाण्याचं टिझर लाँच झालं होतं. त्यालाही सोशल मीडियावर धम्माल प्रतिसाद मिळाला होता. या गाण्यात हिमेश रेशमियाचा कॅप वाला लुक पुन्हा दिसतोय. आणि त्याच्या कॅपवर त्याचा ट्रेड मार्क असलेलं HR असंही लिहिलंय. रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या जोडीने या गाण्याने सोशल मीडियावर पुन्हा धम्माल केलाय.

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे.

याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 15, 2019, 4:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading