Elec-widget

YouTube वर हंगामा, रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचं 'हे' नवं गाणं एकदा ऐकाच

YouTube वर हंगामा, रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचं 'हे' नवं गाणं एकदा ऐकाच

रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या जोडीने या गाण्याने सोशल मीडियावर पुन्हा धम्माल केलीय.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : हिमेश रेशमियाचं (Himesh Reshammiya)  'आशिकी मैं तेरी' (Ashiqui Mein Teri ) हे गाणं कधीकाळी  ब्‍लॉकबस्‍टर ठरलं होतं. आता हिमेश ने रानू मंडल (Ranu Mondal) सोबत या गाण्याचं रिमिक्स तयार केलंय. त्याचं टिझर त्याने सोशल मीडियावर आज रिलीज झालं. त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला असून YouTubeवर हे गाणं सध्या ट्रेड करतंय. या गाण्यात हिमेश रेशमियाचा कॅप वाला लुक पुन्हा दिसतोय. आणि त्याच्या कॅपवर त्याचा ट्रेड मार्क असलेलं HR असंही लिहिलंय. रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या जोडीने या गाण्याने सोशल मीडियावर पुन्हा धम्माल केलीय.

रणवीर सिंगच्या या अभिनेत्रीने बिकिनीवर लिहिलं 'हरे राम', मग झालं असं काही...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मंडल हे रानू यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याच्या तयारीत असून अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिला रानू यांच्या व्यक्तिरेखेसाठी विचारणा केली आहे. याविषयी IANS बोलताना सुदीप्ता म्हणाली, मला या सिनेमाची ऑफर मिळाली आहे मात्र त्याची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही त्यामुळे ती मिळल्यानंतर मी हा सिनेमा करायचा की, नाही हे ठरवणार आहे.

या सिनेमाविषयी ऋषिकेश मंडल सांगतात, रानू मंडल यांचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यांच्या बाबत अधिकाधिक जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे हा सिनेमा तयार कराण्याचा निर्णय मी घेतला. अभिनेत्री सुदीप्ताला मी यासाठी विचारलं कारण या सिनेमात रानू यांच्या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देऊ शकते असं मला वाटतं. तिनं या सिनेमाला होकार दिल्यानंतर बाकी इतर कलाकारांची निवड केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 10:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...