हा रानू मंडल यांचा मुलगा तर नाही? सोशल मीडियावर गाण्याचा नवा VIDEO तुफान व्हायरल!

हा रानू मंडल यांचा मुलगा तर नाही? सोशल मीडियावर गाण्याचा नवा VIDEO तुफान व्हायरल!

'हा मुलगा रानू मंडल यांचा मुलगा तर नाही! या हिऱ्यालाही पारखण्यासाठी कोणी तयार आहे! एकदा नक्की ऐका' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. असाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अगदी सुरेल आवाजात हा गाणं म्हणत आहे. त्यामुळे हा मुलागा रानू मंडल यांचा मुलगातर नाही ना? अशा चर्चांणा उधान आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मुलाचा व्हिडिओ खरा की खोटा याबद्दल आम्ही कोणताच दाव करत नाही आहोत. पण रानू यांना जसं लता मंगेशकर यांची सावली म्हटलं होतं तसं या मुलाला कुमार शानूसारखा आवज आहे असं म्हटलं आहे. फेसबूक व्हायरल झालेल्य़ा या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट करण्यात आल्या आहेत.

'हा मुलगा रानू मंडल यांचा मुलगा तर नाही! या हिऱ्यालाही पारखण्यासाठी कोणी तयार आहे! एकदा नक्की ऐका' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकता हा अगदी सामान्य मुलगा आहे. 'तेरी उम्मीद तेरा इंतजार हम करतें है' हे गाणं अगदी सुरात आणि धुंद होऊन हा मुलगा गात आहे. खरंतर आता रानू मंडल यांच्यासारखी संधी यालाही मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - राष्ट्रवादीला धक्का, 55 नगरसेवक साथ सोडणार; महापालिकेची सत्ताही जाणार

आईच्या प्रसिद्धीचा मॅनेजर्स गैरफायदा घेत आहेत, रानू मंडल यांच्या मुलीचा गंभीर आरोप

सध्या सोशल मीडियात चर्चा असलेल्या गायिका रानू मंडल यांच्या प्रसिद्धीचा त्यांचे मॅनेजर गैरफायदा घेत असल्याचा आरोप रानू यांची मुलगी एलिझाबेथ रॉयनं केला आहे. हे दोन्ही मॅनेजर आपल्याला आईला भेटू देत नाहीत, असंही तिनं म्हटलं आहे. मॅनेजर एतींद्र आणि तपन हे दोघेही आईकडून गरजेचं सामान आणण्याच्या नावाखाली पैसे उकळत आहेत. आईकडे असलेल्या ५० हजारांपैकी १० हजार रुपयांत त्यांनी तिला केवळ एक बॅग आणि काही आवश्यक वस्तू आणून दिल्या आहेत, असा आरोप एलिझाबेथने केला आहे. तसेच हे दोन्ही मॅनेजर मला आईला भेटू देत नाहीत, आईशी संपर्क साधल्यास तुझे हातपाय तोडले जातील अशी धमकी त्यांनी मला दिल्याचंही तिनं म्हटलं आहे.

धक्कादायक बातमी - कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला मुलगा, मदतीसाठी धावली आई; पण कोणीही नाही बचावलं!

मात्र, मुलगी एलिझाबेथचे आरोप स्वतः रानू मंडल यांनी फेटाळले असून एतींद्र आणि तपन आपली चांगली काळजी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या मुलीकडून कोणीतरी हे मुद्दाम बोलून घेत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एतींद्र आणि तपन यांनीही एलिबेथचे आरोप फेटाळून लावले आहेत. तिने आमच्यावर लावलेले आरोप खोटे असून ती आमची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकी वर्षे आईल रेल्वे स्टेशनवर सोडून देणाऱ्या एलिझाबेथला आजच आईची आठवण कशी आली असा सवालही त्यांनी केला आहे. आईला उदरनिर्वाहासाठी एलिझाबेथ केवळ 200 ते 500 रुपये पाठवायची असं या दोन्ही मॅनेजर्सचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण..

VIDEO: 'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं', 'या' निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 01:34 PM IST

ताज्या बातम्या