मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लता मंगेशकर ऑफ राणाघाट: रानू मंडल सध्या काय करतेय? पाहा VIDEO

लता मंगेशकर ऑफ राणाघाट: रानू मंडल सध्या काय करतेय? पाहा VIDEO

एका व्हायरल व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेली रानू मंडल (Ranu Mandal) आठवतेय? ती सध्या काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 10 डिसेंबर: तुम्हाला एका रात्रीत प्रकाशझोतामध्ये आलेली रानू मंडल (Ranu Mandal) आठवतेय? एका रेल्वे स्टेशनवरचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात रानू मंडल प्रकाशझोतात आली. अनेकांनी तिला लता मंगेशकर यांच्या आवाजाचीही उपमा दिली. रानू मंडलचा आवाज अतिशय मधूर आहे. रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल (Ranu mandal's Viral Video) झाला होता तेव्हा ती लता मंगेशकर यांचं एक प्यार का नगमा हैं हे गाणं गात होती. तिचा हा व्हिडीओ बघून संगीतकार हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) तिच्याकडून एक गाणंही गाऊन घेतलं. ते फारसं प्रसिद्ध झालं नाही. त्यानंतर रानू मंडल पुन्हा एकदा प्रसिद्धीपासून दूर गेली. ती सध्या काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एका गाण्यानंतर प्रसिद्धीपासून दूर गेलेली रानू मंडल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. रानू मंडलचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती सागर किनारे... दिल ये पुकारे हे प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहे. रुपांकर बागची (Rupankar Bagchi) या बंगाली गायकाच्या शोमध्ये रानू मंडल गेली होती. त्यात तिने सागर किनारे हे गाणं गायलं होतं. तोच व्हिडीओ सध्या प्रसिद्ध झाला आहे. यात रानू मंडलने आपल्या जीवनातील संघर्षाची कहाणीही सांगितली आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये रानू मंडल पुन्हा तिच्या राणाघाटमधील जुन्या घरामध्ये राहायला गेली. बॉलिवूडमध्ये एक संधी मिळाल्यानंतर तिला पुन्हा फारसं काम मिळालं नाही. त्यामुळे तिची परिस्थितीही पुन्हा जैसे थेच या मार्गावर आली आहे.

" isDesktop="true" id="503864" >

मधूर आवाज असूनही रानू मंडलला गरीब परस्थितीमुळे गाण्याचं शिक्षण घेता आलं नाही. रानू मंडल पश्चिम बंगालच्या राणाघाट इथली रहिवासी आहे. आता या म्युझिक शोनंतर तिचं नशीब पुन्हा फळफळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Viral video.