मी रस्त्यावर नाही जन्मले, खूप चांगल्या कुटुंबातून आहे; आयुष्यावर राणू मंडलचा सगळ्यात मोठा खुलासा!

मी रस्त्यावर नाही जन्मले, खूप चांगल्या कुटुंबातून आहे; आयुष्यावर राणू मंडलचा सगळ्यात मोठा खुलासा!

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रानू यांनी त्यांच्या आयुष्यातील माहित नसलेले अनेक पैलू उलगडले.

  • Share this:

मुंबई: सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे आज बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर झाल्या. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा असाच आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं मात्र त्यासोबतच त्यांच्या भूतकाळातील आयुष्याविषयी अनेक खुलासेही झाले. नुकत्याच एका मुलाखतीत रानू यांनीही स्वतःच्या आयुष्याविषयी नवे खुलासे केले आहेत.

आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत रानू यांनी त्याच्या आयुष्यातील माहित नसलेले पैलू उलगडले. यावेळी त्यांनी त्याच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या चाहत्यांसोबत फेसबुक लाइव्ह सेशन केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्याची कहाणी खूप मोठी आहे. ज्यावर एका सिनेमाची निर्मिती होऊ शकते आणि हा एक खास सिनेमा असेल. काही दिवसांपूर्वी रानाघाट रेल्वे स्टेशनवरील रानू यांचा ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांची प्रसार माध्यमाकडून दखल घेतली गेली. त्यांचा हा व्हिडीओ एका फेसबुक पेजवर गेल्यानंतर रानू यांना एक रिअलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याच ठिकाणी हिमेश रेशमियानं त्यांना त्याच्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर दिली.

सलमान खाननं खरंच रानू मंडल यांना दिलं 55 लाखांचं घर? वाचा काय आहे सत्य

हिमेश रेशमियासाठी रानू यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गायलं. ज्याचा व्हिडीओ स्वतः हिमशेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यांचं हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर त्यांनी हिमेशसाठीच  आदत हे दुसरं गाणं सुद्धा रेकॉर्ड  केलं. आज त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं आयुष्य खूपच वेगळं होतं. आपल्या भूतकाळातील आयुष्याविषयी बोलताना रान सांगतात. ‘माझा जन्म फुटपाथवर झाला नव्हता. मी एका चांगल्या घात जन्माला आले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होत. पण मी फक्त 6 महिन्यांची असताना माझ्या आई-वडीलांपासून वेगळी झाले. माझ्या बहीणीनं मला लहानाचं मोठं केलं. मात्र तिच्यासाठी हे सोपं नव्हतं.’

टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ सिंगलच पण दिशासाठी 'हा' अभिनेता परफेक्ट

रानू पुढे म्हणाल्या, ‘आमच्याकडे घर होतं मात्र ते चालवण्यासाठी माणसं हवी असतात ती मात्र आमच्याकडे नव्हती. त्या दिवसांत आम्ही एकटेपणा काय असतो हे अनुभवलं होतं. मी खूप संघर्ष केला मात्र मला देवावर खूप विश्वास होता. मी त्या-त्या परिस्थितीनुसार गाणं गात असे. मला गाण्याची संधी मिळत होती म्हणून मी गाणं गात नसे तर मला गाण्यावर प्रेम होतं त्यासाठी मी गात असे. मी लता मंगेशकर यांच्या गाण्यांवरून गायला शिकले. त्यांनी मला शिकवलं नाही पण मी त्याच्या कॅसेट आणि रेडिओवरील गाणी ऐकून गाण्याचा प्रयत्न करत असे. काही वर्षांनी माझं लग्न झालं आणि मी मुंबईला शिफ्ट झाले माझे पती फिरोज खान यांच्याकडे जेवण बनवत असत.’

अमेरिकन महिलेनं केला प्रियांका चोप्राचा अपमान, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

रानू सुद्धा आपल्या नवऱ्याला त्याच्या कामात मदत करत असे. पण काही दिवसीं त्यांच्या पतीचं अचानक निधन झालं. पतीच्या निधनानंतर रानू काही दिवस मुंबईमध्ये राहिल्या मात्र त्यांना पतीचा विरह असहय्य झाला आणि त्या पुन्हा एकदा आपल्या गावी परतल्या. मात्र त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतही साधन नव्हतं. शेवटी त्यांनी गाणं गात, भीक मागायला सुरुवात केली. यामुळे त्यांना काही पैसे आणि खायला मिळत असे त्यावर त्या स्वतःची गुजराण करत असत.

रानू यांनी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्या सांगतात, मी खूप खूश आहे. मुंबईमधील संगीताच्या सुविधा माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. माझ्या घराकडून मुंबईला येणं आणि तिथून पुन्हा घरी परतणं खूपच कठीण आहे. मुंबईमध्ये जर माझं घर असतं तर खूप चांगलं झालं असतं. पण मला विश्वास आहे देवावर त्यामुळे मला जास्त विचार करण्याची गरज नाही आहे.

 

View this post on Instagram

 

Beach Life

A post shared by Ranu Mandal (@real_ranu_mondal) on

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खाननं रानू यांना घर भेट दिल्याचं बोललं जात होतं. याविषयी रानू यांना विचारलं असता, त्यानी हे वृत्त खरं नसल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या मी अजून सलमानला भेटलेले नाही. मात्र त्याचा तेरे नाम हा सिनेमा मला खूप आवडतो.  रानू याच्या गोड आवाजानं सध्या सर्वांनाच भूरळ घातली आहे. त्यानंतर आता त्यांना गाण्याच्या बऱ्याच ऑफर्स मिळाल्या आहेत.

नवरी नटली…! आलिया भटचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर VIRAL

============================================================

लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 1, 2019, 1:50 PM IST

ताज्या बातम्या