स्टेशनवर गाणाऱ्या रानू यांना हिमेश रेशमियाने पहिल्याच गाण्यासाठी दिली एवढी रक्कम

मीडिया रिपोर्टनुसार, रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्याचे पैसे घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर हिमेशने त्यांना जबरदस्ती पैसे देऊ केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:19 PM IST

स्टेशनवर गाणाऱ्या रानू यांना हिमेश रेशमियाने पहिल्याच गाण्यासाठी दिली एवढी रक्कम

मुंबई, 26 ऑगस्ट- बंगाल येथील रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल यांना त्यांच्या सुमधूर आवाजामुळे बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली. रानूने बॉलिवूडचा संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या सिनेमातील गाणं गाण्याची संधी मिळाली. रानू यांनी हिमेशच्या आगामी हॅपी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. नुकतीच या गाण्याची एक झलक समोर आली होती.

आता रानू यांना या गाण्यासाठी किती रुपये मिळाले असतील असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. असं म्हटलं जातं की, रानू यांना या एका गाण्यासाठी जवळपास सहा ते सात लाख रुपये मिळाले. विशेष म्हणजे रानू हे मानधन घेत नव्हत्या.

हिमेशने जबरदस्ती दिले पैसे-

मीडिया रिपोर्टनुसार, रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्याचे पैसे घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर हिमेशने त्यांना जबरदस्ती पैसे देऊ केले. एवढंच नाही तर हिमेश म्हणाला की, ‘तुम्हाला बॉलिवूडचा स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.’ याशिवाय नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता की, तो त्याच्या आगामी सिनेमात रानू यांना गाण्याची संधी देईल. याशिवाय अक्षय कुमारच्या सिनेमासाठीही त्या एक गाणं गाणार आहेत.

लता मंगेशकरा यांच्या गाण्याने झाल्या स्टार-

Loading...

काही दिवसांपूर्वी रानू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे त्या एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. कोलकता स्थानकावर रानू या लता मंगेशकर यांच्या प्यार का नगमा है हे गाणं गात होत्या. तिथे उपस्थित अनेकांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की, हिमेश रेशमियाने त्यांना बॉलिवूडमध्ये एक गाणं गाण्याची संधीच दिली.

विद्या बालन म्हणाली, 'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...'

प्रेग्नंट अॅमी जॅक्सनने प्रियकरासोबत पूलमध्ये केलं एन्जॉय, PHOTOS VIRAL

'हर बार पंजाबी क्यों, इस बार मराठी में होगा!' Dream Girl चं प्रमोशन साँग मराठीत!

अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप, प्रेग्नंट असल्याची झाली होती चर्चा

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...