मुलीनं दिलं होतं वाऱ्यावर सोडून, VIRAL VIDEO मुळे प्रसिद्धी मिळाली आणि...

मुलीनं दिलं होतं वाऱ्यावर सोडून, VIRAL VIDEO मुळे प्रसिद्धी मिळाली आणि...

ही आहे रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या आणि आता स्टार झालेल्या रानू मंडलची खरी कहाणी...

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : हिमेश रेशमियाचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’मध्ये गाणं गाणाऱ्या रानू मंडल सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यांनी गायलेलं, ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं सोशल मीडियावर सर्वाधिक ऐकलं गेलेलं गाणं आहे. मात्र या रानू मंडल यांच्या खऱ्या आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आज जाणून घेऊया काय आहे रानू मंडल यांची जीवन कहाणी...

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालची राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.

रानू यांनी केले आहेत स्टेज शो

रानू मंडल यांनी तरुण वयात अनेक स्टेज शो केले आहेत. ज्यासाठी त्यांनी अनेक अवॉर्ड्स सुद्धा दिले गेले आहेत. आज अनेक जुन्या ठिकाणाहून त्यांना गाण्यासाठी बोलवलं जात असल्याचं त्या सांगतात. मात्र आता वयाच्या मानानं त्यांना दूरचा प्रवास करणं शक्य होत नाही. त्या ठिकाणांहून मिळालेले पैसे संपल्यावर त्या पुन्हा रेल्वे स्टेशनवर जातात. या व्यतिरिक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे आणखी केणताच पर्याय उपलब्ध नसल्याचं त्या सांगतात.

कतरिनापासून करिनापर्यंत मोठ्या फॅशन वीकमध्ये मलायका ठरली Hot शो स्टॉपर

सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग स्धी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.

रानू सांगतात, ‘मी रेल्वे स्टेशनवर यासाठी गात असे, कारण माझ्याकडे राहण्यासाठी घर नव्हतं आणि मी गाणं गाऊन माझं पोट भरत असे. कोणी मला बिस्किट देत असे तर कोणी पैसे.’ रानाघाटवर जेव्हा रानू यांनी गाणं गायला सुरुवात केली. तेव्हा काही लोकांनी त्यांचे व्हिडीओ शूट केले. इथे-तिथे शेअर केले. त्यानंतर अनेकांना त्यांच्या गाण्यात लताजींची झलक दिसली. हे असंच चालू राहिलं मात्र त्याचं गाणं काही लोकांमध्येच राहिलं होतं.

क्रिकेटपटू आणि आलियामध्ये रंगले GIF वॉर, चर्चा मुंबईपासून केपटाऊनपर्यंत!

याच दरम्यान काही लोकांनी त्यांना मोठ्या समारंभात गाण्यासाठी बोलवायला सुरुवात केली. मात्र रानू यांना नियमित पैसे आणि खाण्याच्या वस्तू रेल्वे स्टेशनवरुनच मिळत असत. त्यामुळे त्या पुन्हा रेल्वेस्टेशनवर परतत असतं.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं रानू यांचं ‘एक प्यार का नगमा’

रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच यतीद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं प्यार का नगमा व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

हिमेश रेशमियानं दिला पहिला ब्रेक

टीव्ही आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून रानू यांना थोडंफार अटेन्शन मिळालं मात्र याचा काय फायदा होईल हे कोणालाच माहित नव्हतं. त्यानंतर जो कोणी रानूला भेटत असे तो प्रत्येकजण रानूच्या गाण्याचा व्हिडीओ शूट करू लागला. विशेष म्हणजे रानू यांनी कोणालाच नकार दिला नाही. जो कोणी त्यांना गाण्यासाठी विचारत असे त्या गात असतं.

हे सर्व केल्यानं रानू यांना चांगलं वाटत असे मात्र त्यातून त्यांचं पैशाचं काहीही उत्पन्न होत नसे. मात्र रानूचे व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं शोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी यतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.

VIDEO: रस्त्यावर गाणं गात स्टार झालेल्या रानू यांच्या जादुई आवाजाचा दुसरा धमाका

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर परत आली मुलगी

रानू यांना हिमेश रेशमियानं पहिला ब्रेक दिल्यानंतर रानू यांना वाऱ्यावर सोडून गेलेली त्यांची मुलगी 10 वर्षांनी परत आली आणि रानू यांनी सुद्धा मुलीवर राग न ठेवता तिला जवळ घेतलं. यानंतर रानू मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आहेत. त्यांनी नुकतंच हिमेश रेशमियाचं गाणं पूर्ण केलं. याशिवाय हिमेश रेशमिया ज्या रिअलिटी शेमध्ये जज आहे त्या शोमध्येही त्यांनी हजेरी लावली.

VIDEO : मुलगा की मुलगी? बाळाच्या जन्माआधीच अ‍ॅमी जॅक्शननं केला खुलासा

======================================================================

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

First published: August 28, 2019, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading