'या' खास कारणासाठी मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी फडकवणार तिरंगा

'या' खास कारणासाठी मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी फडकवणार तिरंगा

यावेळी ऑस्ट्रेलियाचे मेयर ऑफ मेलबर्न आणि भारताचे कमिश्नर ऑफ इंडियाही उपस्थित राहणार

  • Share this:

मुंबई, 17 जुलैः ऑगस्ट 2018 मध्ये मेलबर्न चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राणी मुखर्जीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या परंपरेनुसार ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येते त्यांना त्यांच्या देशाचा झेंडा फडकवण्याची संधी मिळते. तसेच राणी मुखर्जीला आयएफएफएम पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन देण्यात आले आहे.

याबद्दल बोलताना राणी म्हणाली की, भारताचा झेंडा फडकवायला मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आपल्या देशाचा तिरंगा जर परदेशात फडकवायचे भाग्य लाभत असेल तर त्याहून आनंदाची गोष्ट कोणतीच नाही. राणी म्हणाली की, या महोत्सवात माझी प्रमुख पाहुणी म्हणून निवड झाल्याबद्दल मी फार उत्साही आहे.

आतापासूनच मी महोत्सवात जाण्याची तयारी करत आहे. राणी हजारो ऑस्ट्रेलियन आणि भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भारताचा ध्वज उंचावणार आहे. येत्या 11 ऑगस्टला हा समारंभ ऑस्ट्रेलियाचे मेयर ऑफ मेलबर्न आणि कमिश्नर ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हिचकी सिनेमातील राणीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सिद्धार्थ मल्होत्राने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

हेही वाचाः

कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

गोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 04:26 PM IST

ताज्या बातम्या