मुंबई, 26 मार्च: राणी मुखर्जीचा बॉलीवूडमधील अष्टपैलू कलाकारांमध्ये समावेश होतो. सध्या ती बॉक्स ऑफिसवर आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. नुकताच तिचा 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणीनं काल (21 मार्च) आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तिच्या करिअरमधील आणि आयुष्यातील अनेक चांगल्या-वाईट गोष्टींना सोशल मीडियावर उजाळा मिळाला. यामध्ये अभिषेक बच्चन आणि राणीच्या नात्याबद्दलही चर्चा झाली. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन एकेकाळी एकमेकांचे फार चांगले मित्र होते. त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं होतं. दोघांची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यावेळी या दोघांच्या प्रेमाच्या चर्चाही बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये रंगल्या होत्या. करिश्मा कपूर आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर राणी मुखर्जी बच्चन कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण, अचानक अभिषेकनं राणी मुखर्जीऐवजी ऐश्वर्या रायशी लग्न केलं.
अभिषेक आणि राणीचं नातं तुटण्यासाठी जया बच्चन कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. जया बच्चन राणीच्या एका किसिंग सीनमुळे नाराज होत्या. राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी 'ब्लॅक' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात शेवटी राणी आणि अमिताभ बच्चन यांनी लिप किसिंग सीन दिलेला आहे.
हेही वाचा - अशोक सराफ यांची लाडक्या लेकीला खास गिफ्ट, सायली संजीवला मायेची ऊब म्हणून दिली 'ही' भेट
संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट अनेक भाव-भावनांनी भरलेला होता. ज्यामध्ये राणी आणि अमिताभ बच्चन यांनी अप्रतिम अभिनय केला होता. संपूर्ण चित्रपटाबद्दल जया बच्चन यांना काहीही आक्षेप नव्हता. पण, शेवटच्या लिप किसिंग सीनबाबत त्या नाराज होत्या. आपल्या भावी सुनेनं सासऱ्यांना किस करावं, हे जया बच्चन यांना योग्य वाटत नव्हतं. मात्र, राणी मुखर्जी या सीनसाठी तयार होती. याचाच परिणाम म्हणून अभिषेक आणि तिचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं.
या एका सीनमुळे जया बच्चन यांची नाराजी एवढी वाढली होती की, त्यांनी राणी मुखर्जीला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नाचं निमंत्रणही नव्हत दिलं. असं म्हटलं जातं की, राणी मुखर्जीनं याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की, ती अभिषेक बच्चनला चांगला मित्र मानत होती पण, तो केवळ एक को-स्टार ठरला. अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राणी मुखर्जीनं यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News