मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘तू देशातील सर्वात रिकामटेकडा माणूस’; संतापलेल्या रंगोलीनं घेतला अभिनेत्याशी पंगा

‘तू देशातील सर्वात रिकामटेकडा माणूस’; संतापलेल्या रंगोलीनं घेतला अभिनेत्याशी पंगा

त्याची ही प्रतिक्रिया रंगोलीला आवडली नाही अन् तिनं त्याला पृथ्वीवरील ओझं असं म्हटलं. पाहूया दोघांमध्ये रंगलेलं सोशल मीडियावरील हे शाब्दिक वॉर (Rangoli Chandel Karan Patel tweet war)

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 6 मे: कंगना रणौत (Kangana Ranaut) प्रमाणंच तिची बहिण रंगोली (Rangoli Chandel) देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. अलिकडेच कंगनाचं ट्विटर अकाउंट अधिकृतरित्या बंद करण्यात आलं. यामुळं काही सेलिब्रिटींनी तिची खिल्ली उडवली होती. (Karan Patel) यापैकी एक करण पटेल होता. अकाउंट सस्पेंट करण्यापूर्वी तिनं देशातील ऑक्सिजन प्लांट संदर्भात एक ट्विट केलं होतं. या ट्विटला स्क्रिनशॉट काढून करणनं तिची खिल्ली उडवली. मात्र त्याची ही प्रतिक्रिया रंगोलीला आवडली नाही अन् तिनं त्याला पृथ्वीवरील ओझं असं म्हटलं. पाहूया दोघांमध्ये रंगलेलं सोशल मीडियावरील हे शाब्दिक वॉर (Rangoli Chandel Karan Patel tweet war) कंगनाच्या ट्विटवर टीव्ही अभिनेता करणनं जोरदार टोलेबाजी केली होती. ‘ही महिला देशातील सर्वोत्तम विनोदवीर आहे’ अशा आशयाची कॉमेंट करत करणनं तिची खिल्ली उडवली होती. या कॉमेंटवर रंगोलीनं इन्स्टापोस्टद्वारे उत्तर दिलं. ‘तू देशातील सर्वात रिकामटेकडी व्यक्ती आहेस. ज्याने कधीही पर्यावरणासाठी काही केलेले नाही आणि तू पृथ्वीवर ओझे आहेस’ असं ती त्याला म्हणाली. सध्या दोघांचं हे शाब्दिक युद्ध सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तारक मेहतामध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पाहा काय म्हणाली सुनैना फौजदार खरं तर कंगनानंच कदाचित त्याला उत्तर दिलं असतं. परंतु तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. गेले काही दिवस कंगना सातत्याने ममता बॅनर्जींविरोधात ट्वीट करत होती. रोहिंग्या, CAA, NRC सगळ्याबद्दल तिनं कंमेट्स केल्या. बंगालची तुलना काश्मीरशीही करून झाली. शेवटी कोलकात्यामधील एका वकिलाने कंगनाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केली. “कंगना रणौत बंगालच्या लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. तिच्या वक्तव्य आणि पोस्ट्समुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते”, अशी तक्रार या वकिलाने केली. त्यानंतर ट्विटरनेही तातडीने कारवाई करत तिचं अकाउंट सस्पेंड केलं. कंगनाची मॅनेजर म्हणून काम करणारी तिची बहीण रंगोली चंडेल हिचं अकाउंटही गेल्या महिन्यात ट्विटरने काढून टाकलं होतं. द्वेषमूलक मजकूर लिहिल्याने ट्विटरच्या धोरणांचं उल्लंघन झाल्याचं सांगत त्या वेळी ट्विटरने कारवाई केली होती.
First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut, Tweet

पुढील बातम्या