Home /News /entertainment /

VIDEO: सासूबाईंच्या घरी येण्याने दीपाच्या आयुष्याला नवं वळण! 'रंग माझा वेगळा' मालिकेत महा ट्विस्ट

VIDEO: सासूबाईंच्या घरी येण्याने दीपाच्या आयुष्याला नवं वळण! 'रंग माझा वेगळा' मालिकेत महा ट्विस्ट

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegala) ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेने सर्वांनाच भुरळ पाडली आहे.

  मुंबई, 21 जानेवारी-   'रंग माझा वेगळा'    (Rang Maza Vegala)   ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. त्याच त्याच विषयांना फाटा देत. एका वेगळ्या विषयावर विणलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळेच प्रेक्षक खिळून राहतात. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असाच काहीसा नवा ट्विस्ट दिसून येत आहे. पाहूया काय आहे हा ट्विस्ट. स्टार प्रवाहवर 'रंग माझा वेगळा' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांवर आपली पकड घट्ट केली होती. ती पकड अजूनही तशीच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे टीआरपी रेसमध्ये ही मालिका प्रत्येक आठवड्याला पहिल्या स्थानावर पाहायला मिळत आहे. मालिकेत दीपा-कार्तिक यांचं अबोल प्रेम आणि त्यांच्या मुली याभोवती फिरत असलेली कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकताच स्टार प्रवाहाने या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या ट्विस्टमुळे दीपा पुन्हा कार्तिकसोबत तिच्या घरी जाणार का? अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दीपाची सासू अर्थातच कार्तिकची आई सौंदर्या दीपाच्या घरी आलेली दिसत आहे. आपल्या सासूबाईंना इतक्या वर्षानंतर आलेलं पाहून दीपासुद्धा भारावून गेली आहे. सौंदर्यासुद्धा दीपाला पाहून भावुक झाली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  या प्रोमोमध्ये महत्वाची बाब म्हणजे सौंदर्या दीपाच्या घरी राहण्यासाठी आली आहे. त्यामुळे दीपा आश्चर्यचकित झाली आहे. सौंदर्या आपण इथेच या घरात राहणार असल्याचं दीपाला सांगते. परंतु दीपा या गोष्टीला नकार देते.दीपाचं म्हणणं असतं तुमच्यासाठी हे घर खूपच लहान आहे. कारण श्रीमंत असणाऱ्या आणि मोठ्या घरात राहणाऱ्या सौंदर्यासाठी इतक्या लहान साध्या घरात राहणं कठीण होईल असं दीपाला वाटत असतं. त्यामुळे ती त्यांचं म्हणणं मान्य करत नसते. यावर सौंदर्या दीपाला भावुक होऊन म्हणताना दिसत आहे, 'लेकीच्या दारात आलेल्या आईला तू परत पाठवणार का? यावर दीप त्यांना म्हणते तुमची इथे खूप गैरसोय होईल. तुम्ही कसे राहाल इथे? यावर सौंदर्या म्हणते 'मी गेली सहा-सात वर्षे तुझ्यासाठी किती तळमळली आहे माहितेय का तुला? तुझ्या मनात या आईसाठी जागा नाही का ग? सासूबाईंच्या येण्याने दीपाच्या आयुष्याला कोणतं नवं वळण लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या