Home /News /entertainment /

कार्तिक- दीपा 'या' एका गोष्टीमुळे पुन्हा आले एकत्र, आता तरी बहरणार का त्यांचं नातं?

कार्तिक- दीपा 'या' एका गोष्टीमुळे पुन्हा आले एकत्र, आता तरी बहरणार का त्यांचं नातं?

रंग माझा वेगळा : दीपा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. पण तसं काही होताना दिसत नाही.

  मुंबई, 10 मे- स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा  ( rang maza vegla ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. दीपा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. पण तसं काही होताना दिसत नाही. त्यांच्यातील दुरावा काही संपता संपेना असचं काहीसं चित्र सध्या दिसत आहे. पण आता यात देखील एक आशेचा किरण निर्माण झालं आहे. आधीप्रमाणे पुन्हा एकदा दीपा आणि कार्तिक रूग्णांची सेवा करताना दिसणार आहेत. त्यामुळं त्यांच्यात पुन्हा प्रेम फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच या जोडीला एकत्र पाहता येईल अशी ( rang maza vegla latest episode ) अशा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. नुकताच एक प्रमो समोर आला आहे. यामध्ये दीपा आणि कार्तिक एकत्रपणे रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. या दोघांच्यातील बॉन्डिंग आजही टिकून असल्याचे हा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते. यानिमित्त या दोघांना पुन्हा त्यांच्यात असणाऱ्या प्रेमाची जाणीव होईल का याचा उलगडा लवकरच होईल. प्रेक्षक मात्र या दोघांना एकत्र पाहून आनंदात आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  कार्तिक डॉक्टर आहे तर दीपा नर्स आहे. दोघांनाही रूग्णांची सेवा करायला आवडते. या एका गोष्टीमुळं दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याच निर्णय घेतला. दोघांनी लग्न केलं पण काही गैरसमज झाल्याने याचं नातं जास्त काळ टिकलं नाही. दीपाला कार्तिकपासून दोन्ह मुली आहेत. या मुलींना देखील वाटतं या दोघांनी एकत्र यावं मात्र तसं होताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित आता यावेळी रूग्णांची सेवा करत असताना कार्तिक आणि दीपाला त्यांचे जुने दिवस आठवतील आणि त्यांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव होईल अशी अशा निर्माण झाली आहे. प्रेक्षक देखील याची वाट पाहत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या