• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा No Makeup लुक पाहून नेटकरी काय म्हणाले...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा No Makeup लुक पाहून नेटकरी काय म्हणाले...

नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा नो मेकअप लुक शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (rang maza vegla ) मालिकेने कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेचे कथानक आणि यातील पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे ( reshma shinde )हिने निभावली आहे. नुकताच दीपाने तिचा नो मेकअप लुक असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहे. अनेकवेला अभिनेत्री नोमेकअप लुकमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. मात्र रेश्माच्या बाबतीत उलट झालं आहे. रेश्माने काळ्या टॉपमध्ये एक तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर म्हटले आहे की, स्माईल एक असे वळण आहे जे सर्व काही ठीक करते. रेश्माचा हा नो मेकअप लुक नेटकऱ्यांना देखील रूचला आहे. त्यांनी देखील कमेंट करत तिच्या या लुकला पसंती दर्शवली आहे.
  एका नेटतऱ्याने म्हटले आहे की, लय भारी दिसतेस, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, खूप सुंदर, गालावर खळी, सुंदर  तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्या या लुकला पसंती दर्शवली आहे.रेश्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मालिकेत चुडीदारमध्ये दिसणारी दीपा मात्र खऱ्य अयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. वाचा  : Bigg Boss Marathi: 'तो आपल्या माणसांचा होऊच शकत नाही' जयने विशालवर केला हल्लाबोल रेश्मा शिंदेने नांदा सौख्यभरे, चाहूल , केसरी नंदन, लगोरी या मालिकेत काम केले आहे. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती दिसली आहे. सध्या तिची दीपा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.  या मालिकत दीपाचे अभिनयाचे सोबत तिनं साकारलेल्या भूमिकचे प्रेक्षकांकडून नेहमी कौतुक होत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: