मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rang Majha Vegala: दीपिका आणि कार्तिकी एकमेकींना राखी बांधत साजरी करणार रक्षाबंधन; मालिका रंजक वळणावर

Rang Majha Vegala: दीपिका आणि कार्तिकी एकमेकींना राखी बांधत साजरी करणार रक्षाबंधन; मालिका रंजक वळणावर

Deepika and kartiki from Rang maza vegala

Deepika and kartiki from Rang maza vegala

रंग माझा वेगळा मालिकेत एकीकडे सध्या कार्तिक आणि दीपा दीपिकाच्या कस्टडीसाठी कोर्टात लढा देत असताना दुसरीकडे मात्र दीपिका आणि कार्तिकीच नातं अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे नक्की काय घडणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 8 ऑगस्ट : रंग माझा मालिका प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंतीची मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या प्रत्येक ट्रॅकला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. मालिकेत दीपाला दीपिका ही  तिचीच मुलगी असल्याचं सत्य समजल्यापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. दीपा दीपिकाची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय. पण कार्तिकलासुद्धा दीपिकाची कस्टडी  हवी आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या दीपिकासाठी भांडण चालू आहे. कोर्टामध्ये दोघेजण वाद घालत आहेत. पण या दोघांच्या भांडणात दीपिका आणि कार्तिकी यांचं नातं मात्र अजून जास्त मजबूत होताना पाहायला मिळत आहे.  मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार दीपिका आणि  भांडण सुरु असलं तरी त्यांच्या  मुलींना मात्र आयुष्यभरासाठी  एकमेकींची साथ हवी आहे. मालिकेत येणाऱ्या काळात रक्षाबंधन स्पेशल भाग दाखवला जाणार आहे. या भागात दीपिका आणि कार्तिकी मिळून रक्षाबंधन साजरं करणार आहेत. या भागाचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यानुसार कार्तिकी आणि दीपिकाला  अजूनही त्या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत हे सत्य माहिती नाहीये. तरीही त्या एकमेकींना बहिणीच मानत आहेत. कार्तिकी दीपिकाला रक्षाबंधनादिवशी राखी बांधणार आहे.
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

कार्तिकी दीपिकाला म्हणते, 'आज रक्षाबंधनला मी तुला राखी बांधणार आहे.' त्यावर दीपिका तिला म्हणते, 'तू माझी बहीण नाहीयेस.' पण कार्तिकी तिला उत्तर देते कि, 'तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना. म्हणजे तू मला बहिणीसारखीच वाटतेस.' एवढं बोलून दोघी एमेकींना राखी बांधतात. आणि आयुष्यभर एकमेकींना साथ देण्याचं आणि एकमेकींची रक्षा करण्याचं वचन घेतात. हेही वाचा - Sonalee Kulkarni: महाराष्ट्राच्या अप्सरेचं लंडनमध्ये लग्न; सोनाली-कुणालच्या वेडिंग स्टोरीचा ट्रेलर आला समोर आता या दोघींच्या या नव्या नात्याचा परिणाम कार्तिक आणि दीपिकावर होणार का, या दोघींसाठी ते आपलं भांडण थांबवणार का हे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. तसेच कार्तिकी आणि दीपिकाला त्या दोघी सख्या  बहिणी असल्याचं सत्य कधी समजणार आणि दीपिकाची कस्टडी नक्की कोणाकडे जाणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रंग माझा वेगळा मालिकेचा चाहतावर्ग खूप  मोठा आहे. टीआरपीच्या शर्यतीत 6.7  रेटिंगसह  ही मालिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या मालिका अतिशय  उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. त्यामुळे मालिकेत येणारे नवीन प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतील यात काही   शंका नाही.
First published:

Tags: Marathi entertainment

पुढील बातम्या