मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Reshma Shinde: 'अति घाई संकटात नेई','रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेसोबत रेल्वे स्टेशवर घडलं असं काही....पाहा Video

Reshma Shinde: 'अति घाई संकटात नेई','रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेसोबत रेल्वे स्टेशवर घडलं असं काही....पाहा Video

रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

'रंग माझा वेगळा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली दीपा अर्थातच अभिनेत्री रेश्मा शिंदे होय. रेश्माला या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 29 जानेवारी-  'रंग माझा वेगळा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली दीपा अर्थातच अभिनेत्री रेश्मा शिंदे होय. रेश्माला या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत रेश्माबाबत नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला उत्सुक असतात. अभिनेत्रीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. दरम्यान अभिनेत्रीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री 'अति घाई संकटात नेई' असं बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या दीपासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी चाहते धडपडत आहेत. पाहूया काय आहे नेमका व्हिडीओ.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने अल्पवधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही या मालिकेने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या स्थानावर असते. मालिकेची हटके कन्सेप्ट आणि दीपाचा अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिका प्रचंड पसंत पडत आहे. या मालिकेत दीपाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने साकारली आहे. रेश्माला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.

(हे वाचा:Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने वडापाव खाणं का सोडलं? कारण ऐकून तुमचेही डोळे पाणावतील )

रेश्मा शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचं प्रेम आणि प्रतिसाद मिळत असतो. अभिनेत्रीचे बरेच रील्स व्हायरलदेखील होत असतात. दरम्यान रेश्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

रेश्मा शिंदे या व्हिडीओमध्ये 'अति घाई संकटात नेई' असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे चाहते दीपा नेमक्या कोणत्या संकटात सापडली आहे या विचारात पडले आहेत. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये रेश्मा आपल्या एका मैत्रिणीसोबत दिसून येत आहे. त्या दोघीही स्टेशनवर आलेल्या दिसून येत आहेत.सोबतच अभिनेत्रीने आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याच सांगितलं आहे.

रेश्मा शिंदे या व्हिडीओमध्ये युट्युब वलॊगरची नक्कल करताना दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ टीआरपी मराठीने शेअर करत कॅप्शन देत न्यू वलॊगर इन द टाऊन असं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये रेश्मा अतिशय मजेशीर संवाद साधताना दिसून येत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्रेटींनीसुद्धा या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment