• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याचा मृत्यू? शेवटी सिद्धार्थनेच सांगितला धक्कादायक प्रकार

'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याचा मृत्यू? शेवटी सिद्धार्थनेच सांगितला धक्कादायक प्रकार

याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै : साउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार सिद्धार्थ (Siddharth) बाबत सोशल मीडियावर धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. यामुळे त्याचे चाहते त्रस्त झाले आहेत. यावर आता अभिनेत्याने स्वत: व्हायरल होत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने याबाबत स्वत: ट्वीट केलं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची घोषणा यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दहा साऊथ इंडियन सेलिब्रिटींची नावं घेण्यात आली आहे. या सेलिब्रिटींनी कमी वयात जगाला निरोप दिला. या लिस्टमध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याच्या नावाचाही समावेश आहे. एका फॅनने या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ दिसत आहेत. सिद्धार्थला यूट्यूबने दिलं विचित्र उत्तरभिनेत्री सौंदर्यायाचं 2004 साली निधन झालं. आरती अग्रवाल हिने 2015 मध्ये जग सोडलं. पण सिद्धार्थ अजूनही जिवंत आहे. जेव्हा सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळालं तर त्याने यूट्यूबवर याबाबत जबाब विचारला. मात्र यूट्यूबने उत्तरात काय म्हटले हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिद्धार्थच्या बातमीवरुन यूट्यूबर सांगण्यात आलं की, त्यांना या व्हिडिओमध्ये कोणतीही समस्या दिसत नाही. हे ही वाचा-‘खोटी स्तुती करून स्पर्धकांना बिघडवू नका’; सोनू निगमची Indian Idolला विनंती सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते अनेक विषयांत आपलं मत व्यक्त करतात. त्यांनी कोरोना दरम्यान अनेक विषयांवर आपला आवाज उठवला आहे. इतरच नाही तर वेळेप्रसंगी त्यांनी सरकारवरही टीका केली आहे. सिद्धार्थचे चित्रपट सिद्धार्थला (Siddharth) शेवटी 'अरुवम' या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. नुकतच सिद्धार्थने 'महा समुद्रम'चं शूटिंग संपवलं आहे. याशिवाय सिद्धार्थ  'इंडियन 2', 'टक्कर', 'नवरस' आणि 'शैतान का बच्चा' यातही दिसला होता.
  Published by:Meenal Gangurde
  First published: