मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rajiv Kapoor Death: निधनापूर्वी राजीव यांच्यासोबत नेमकं काय झालं, रणधीर यांनी सांगितली घटना

Rajiv Kapoor Death: निधनापूर्वी राजीव यांच्यासोबत नेमकं काय झालं, रणधीर यांनी सांगितली घटना

राजीव कपूर (Rajiv Kapoor Death) यांचं 9 फेब्रुवारीला निधन झालं. अभिनेतेच्या  निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडनं शोक व्यक्त केला तसंच कुटुंबातील सदस्यही अजून सदम्यामध्ये आहेत.

राजीव कपूर (Rajiv Kapoor Death) यांचं 9 फेब्रुवारीला निधन झालं. अभिनेतेच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडनं शोक व्यक्त केला तसंच कुटुंबातील सदस्यही अजून सदम्यामध्ये आहेत.

राजीव कपूर (Rajiv Kapoor Death) यांचं 9 फेब्रुवारीला निधन झालं. अभिनेतेच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडनं शोक व्यक्त केला तसंच कुटुंबातील सदस्यही अजून सदम्यामध्ये आहेत.

मुंबई 14 फेब्रुवारी : 2021 वर्षाला सुरूवात होताच कपूर परिवारातील आणखी एका सदस्यानं शेवटचा श्वास घेतला. अभिनेता आणि चित्रपट निर्माता राजीव कपूर (Rajiv Kapoor Death) यांचं 9 फेब्रुवारीला निधन झालं. अभिनेतेच्या  निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडनं शोक व्यक्त केला तसंच कुटुंबातील सदस्यही अजून सदम्यामध्ये आहेत. राजीव कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूरही पूर्णपणे खचून गेले आहेत. त्यांनी मागील काही दिवसात आपल्या जवळच्या व्यक्तींना जगाचा निरोप घेताना पाहिलं आहे.

मृत्यूच्या काही वेळ आधी राजीव कपूर यांच्यासोबत काय झालं -

राजीव कपूर यांचं जाणं रणधीर कपूर यांच्यासाठी एखाद्या सदम्यापेक्षा कमी नव्हतं. या महान अभिनेत्याची आठवण काढताना रणधीक यांनी त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी या गोष्टीचादेखील खुलासा केला, की निधनाच्या काही वेळआधी नेमकं काय घडलं. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर म्हणाले,की माझ्यासोबत 24 तास एक नर्स असते, कारण मला चालताना त्रास होतो. त्यादिवशी सकाळी साडेसात वाजता नर्स वरती राजीवला उठवण्यासाठी गेली. मात्र, राजीव यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. नर्सच्या ही गोष्ट लक्षात आली, की त्यांच्या हाताची नाडी अत्यंत धीम्या गतीनं काम करत आहे. यानंतर लगेचच राजीव .यांना रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं.

भावूक झाले रणधीर कपूर -

रणधीर यांच्या भावनिक वाक्यांनी सर्वच चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रणधीर कपूर यांच्यासाठी हे एक असं नुकसान आहे, जे शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. ते आता फक्त इतकंच म्हणत आहेत, की ते आता एकटेच राहिले आहेत. त्यांच्या नजरेत ऋषी कपूर आणि राजीव कपूर त्यांच्या आयुष्यातले दोन महत्त्वाचे स्तंभ होते. राजीव आणि ऋषी कपूर यांच्याशिवाय कृष्णा कपूर आणि मोठी बहिण रितू यांचंही निधन झालं आहे.

First published:

Tags: Actor, Bollywood