मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'साज़िश बहुत बड़ी है!' कंगना आणि रिहानाबद्दल रणदीप हुडाने शेअर केला VIDEO

'साज़िश बहुत बड़ी है!' कंगना आणि रिहानाबद्दल रणदीप हुडाने शेअर केला VIDEO

Rihanna आणि Kangana साज़िश बहुत बड़ी है! असं लिहून बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) शेअर केलेला VIDEO पाहिलात का?

Rihanna आणि Kangana साज़िश बहुत बड़ी है! असं लिहून बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) शेअर केलेला VIDEO पाहिलात का?

Rihanna आणि Kangana साज़िश बहुत बड़ी है! असं लिहून बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) शेअर केलेला VIDEO पाहिलात का?

मुंबई, 05 फेब्रुवारी: सध्या देशात शेतकरी आंदोलन, बॉलीवूड आणि हॉलीवूड यांची राजकीय सरमिसळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत अमेरिकन पॉप स्टार रिहानाने (Rihanna) भाष्य केल्यानंतर कंगना राणौत (kangana Ranaut) तिच्या विरोधात पेटून उठली आहे. कंगनाने रिहानाच्या ट्वीटवर कडक शब्दांत उत्तर दिलं होतं. असं असतानाच बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) एक ट्वीट (Tweet) केलं आहे. ज्यामध्ये त्याने त्याची 2010 साली प्रदर्शित झालेली 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई' या चित्रपटातला एक व्हिडिओ क्लिप (Video Clip) शेअर केली आहे. ज्यामध्ये रणदीप हुड्डा कंगना राणौतच्या रिहाना व्यक्तीरेखेबाबत बोलत आहे.

हा व्हिडिओ रणदीप हुड्डाने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'खूप मोठं षडयंत्र आहे' त्यानंतर त्याने एक हसणारा इमोजीही शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, कंगनाने रिहानाची व्यक्तीरेखा साकारली आहे. तर रणदीपने एका पोलिसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. 7 सेकंदाची ही क्लिप आतापर्यंत जवळपास 3 लाख लोकांनी पाहिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कंगना सतत रिहानावर टिका करताना दिसत आहे. रिपब्लिक टीव्हीला मुलाखतीत कंगनाने रिहानावर थेट हमला करत तिने या एका ट्वीटसाठी किमान 100 करोड रुपये घेतले असतील, असा आरोप केला आहे. रिहाना आजपर्यंत कोविड-19 विषाणूबाबत एकही ट्वीट केलं नाही. अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरही तिने एकही शब्द उच्चारला नाही. आणि आज तिने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्वीट केलं आहे. त्यामुळे हे ट्वीट पैसे न घेता केलं जाऊ शकत नाही, असा आरोप कंगनाने रिहानावर केला आहे.

हेही वाचा - #BlackLivesMatter चा मुद्दा आणत गौहर खानने बॉलिवूडकरांना मारला टोमणा

रिहानाने दोन दिवसांपूर्वी भारतील शेतकरी आंदोलनाचा एक फोटो ट्वीट करत लिहिलं होतं की, 'आपण यावर का बोलत नाही?' या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने म्हटलं की, 'यावर कोणीच बोलत नाहीये, कारण हे शेतकरी नाहीत. ते आतंकवादी आहेत. जे भारताला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण चीन आमच्या कमजोर आणि दुभागलेल्या भारतावर कब्जा करू शकेल.' यानंतर बॉलीवूडचंही दोन गटात विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं. रिहानाच्या ट्वीटला काहीजण पाठिंबा देत आहेत, तर काहीजण तिच्यावर टीका करताना दिसत आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Farmer protest, Kangana ranaut