मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबाबत मोठी अपडेट; आता अभिनेताच सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबाबत मोठी अपडेट; आता अभिनेताच सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

swatantryaveer savarkar biopic

swatantryaveer savarkar biopic

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटातून आता महेश मांजरेकर यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता दिग्दर्शन कोण करणार अशी चर्चा सुरु असताना चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 22 सप्टेंबर :  रणदीप हुड्डा अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. याचवर्षी म्हणजे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट हिंदी भाषेत तयार होणार असला तरी मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. त्यांनी सोशल मीडियावर तशी माहितीदेखील दिली होती. पण आता महेश मांजरेकर यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता दिग्दर्शन कोण करणार अशी चर्चा सुरु असताना चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा अभिनेताच दिगदर्शनाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. रणदीप हुडा हा इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. सरबजीत अभिनेत्याने नेहमीच हायवे, एक्स्ट्रॅक्शन आणि बागी 2 सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या निर्दोष अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटातील मुख्य भूमिकेत हा अभिनेता पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ताज्या अपडेटनुसार, तो केवळ चित्रपटातच अभिनय करणार नाही, तर चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. हेही वाचा -  National Cinema Day : 'या' दिवशी चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का? एका  वृत्तानुसार, पुढील आठवड्यात 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चे शूटिंग महाराष्ट्रात सुरू होणार आहे. चित्रपटाच्या तयारीबद्दल बोलताना, रणदीपने  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कोणतीही कसर सोडलेली  नाही. यापूर्वी त्याने आपल्या चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता. हा अभिनेता स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार आहे.
अजूनतरी महेश मांजरेकर यांचं या चित्रपटाच्या बाहेर पडण्यामागचं कारण समोर आलेलं नसून रणदीपनेदेखील याबद्दल कुठेच भाष्य केलेलं नाही. चित्रपटाच्या विषयाला होणारा विरोधामुळे मांजरेकर यातून बाहेर पडले आहेत की यामागे आणखी काही तांत्रिक कारणं आहे ते खुद्द महेश मांजरेकरच सांगू शकतील. पण सध्या तरी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रणदीपकडे असणार आहे.
First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या