• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Radheचं प्रमोशन करताना रणदीप हुड्डाला वाटतंय अपराधी; सलमानच्या चित्रपटावर नाराज

Radheचं प्रमोशन करताना रणदीप हुड्डाला वाटतंय अपराधी; सलमानच्या चित्रपटावर नाराज

या चित्रपटात सलमान खानबरोबर दिशा पटानी,जॅकी श्रॉफ,रणदीप हुडा आदी कलाकार आहेत. रणदीप हुडा(Randeep Hooda)यात खलनायकाची भूमिका साकारत आहे.

 • Share this:
  मुंबई 12 मे: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood)चर्चा आहे ती सलमानखानच्या (Salman Khan)ईदच्या(Eid) मुहूर्तावर 13 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या राधे या चित्रपटाची. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार प्रसिद्धी सुरू आहे. जिथं चित्रपटगृह खुली आहेत तिथं चित्रपट गृहांमध्ये आणि झी 5च्या(ZEE 5)झी प्लेक्स(Zee Plex)या ओटीटी प्लटफॉर्मवर (OTT Platform)अशा दोन्ही माध्यमांतून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर दिशा पटानी,जॅकी श्रॉफ,रणदीप हुडा आदी कलाकार आहेत. रणदीप हुडा(Randeep Hooda)यात खलनायकाची भूमिका साकारत आहे. रणदीप सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेत व्यस्त आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमशीत्यानं संवाद साधला. ‘गेल्या वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल,अशी अपेक्षा होती;पण कोरोनाच्या साथीमुळे शक्य झालं नाही. गेल्या वर्षी माझा ‘एक्सट्रॅक्शन’ हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ताणावर मात करण्यासाठी काहीतरी विरंगुळा हवा होता. तो चित्रपटामुळे मिळाला. घरबसल्या लोक तास-दोन तासांसाठी का होईना परिस्थिती विसरले. त्यांचे मनोरंजन झालं. तसाच अनुभव ‘राधे’ चित्रपटाबाबत येईल अशी अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात लोक हा चित्रपट बघतील आणि काही काळासाठी का होईना ते सध्याची गंभीर परिस्थिती विसरून हसतील,आनंदी होतील,या कल्पनेनं बरं वाटतं. तर त्याचवेळी देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत चित्रपटाची प्रसिद्धी करत असल्याबद्दल मला अपराधीही वाटतं;पण हा आमच्या कामाचाही भाग आहे. 500 पेक्षा जास्त लोकांची मेहनत या चित्रपटासाठी पणाला लागली आहे. त्यामुळं वर्षभरानंतर हा चित्रपट प्रदर्शित होतोय याचा आनंदही आहे,’अशी भावना रणदीप हुडा यानं या वेळी व्यक्त केली. अभिनेत्री हुमा कुरेशी उभारतेय ऑक्सिजन प्लांटसह हॉस्पिटल, हॉलिवूड दिग्दर्शकही करणार मदत यातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रणदीप म्हणाला की,हा चित्रपट सलमान खानच्या इतर चित्रपटांप्रमाणे अॅक्शनपट आहे. यामध्ये मी खलनायक आहे. अंतर्बाह्य काळी असणारी ही व्यक्ती कपडेही काळेच घालते.’ सलमानसोबत रणदीपचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी किक आणि सुलतान या दोन चित्रपट रणदीपनं काम केलं आहे.‘आमच्यातील मैत्री वाढत आहे,अनेक चढ -उतार आम्ही अनुभवले;पण सलमान सोबत काम करण्याची मजाच काही वेगळी असते,असंही त्यानं सांगितलं. एकाचवेळी चित्रपटगृह आणि ओटीटी प्लटफॉर्मवर अशा हायब्रीड पद्धतीनं चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं आम्हीही याला मिळणारा प्रतिसाद अनुभवण्यासाठी उत्सुक आहोत. ज्या ठिकाणी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही,तिथल्या प्रेक्षकांना ओटीटी प्लटफॉर्ममुळे चित्रपट प्रदर्शित होताक्षणीच पाहायला मिळेल. वाट पहावी लागणार नाही. तसंच संपूर्ण कुटुंबाला घरी बसून अगदी कमी खर्चात चित्रपट पाहता येईल. प्रत्येकाचे तिकीट काढण्याचा खर्च वाचेल आणि बाहेरही जावं लागणार नाही. त्यामुळं या संमिश्र पद्धतीमुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अशा आहे,असंही हुडा यानं म्हटलं आहे.
  First published: