सलमानच्या ‘राधे’समाेरील अडचणी वाढल्या, अभिनेत्याला झाली दुखापत

सलमानच्या ‘राधे’समाेरील अडचणी वाढल्या, अभिनेत्याला झाली दुखापत

सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा 'राधे'च्या सेटवर अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : अभिनेता सलमान खानचा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणं तितकंसं सोपं दिसत नाही. आधी संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा ‘इन्शाअल्लाह’ सिनेमा बंद झाल्यानंतर सलमाननं प्रभूदेवासोबत ‘राधे’च्या शूटिंगला सुरुवात केली. पण त्यातही आता विघ्न येण्यासा सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मेकर्सनी शोचा कालावधी वाढवला. सलमाननं पूर्वीच या सिनेमाला डेट दिल्या असल्यानं त्याला आता या शोसाठी वेळ देणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यानं हा सोडल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता या सिनेमाच्या मेकर्ससमोर दुसरी समस्या उभी राहिली आहे. ‘राधे’ सिनेमाच्या सेटवर नुकतीच एक दुर्घटना घडली आणि त्याची शिकार ठरला या सिनेमाचा खलनायक रणदीप हुड्डा. त्यामुळे आता हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्याच्या शक्यता फार कमी आहेत.

‘राधे’ हा एक जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. अनेकांचं म्हणणं आहे की हा सिनेमा ‘वॉन्टेड’ पुढचा भाग असणार आहे. या सिनेमासाठी काही कोरियन अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि तज्ज्ञांना बोलवण्यात आलं आहे. या सिनेमात सलमान शर्टलेस फाइटसोबतच स्मोक फाइट, गन शूट-आउट आणि हाणामारी करताना दिसणार आहे. पण यात परफेक्शन आणण्यासाठी कोरियन अ‍ॅक्शन डायरेक्टर्सची मदत घेतली जात आहे.

Tanhaji सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, अजय देवगणचा हटके अंदाज

अशाच एका अ‍ॅक्शन सीन दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. ज्यात अभिनेता रणदीप हुड्डाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं. डॉक्टरांनी त्याला काही दिवसांसाठी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यानंतर रणदीप लवकरच सिनेमाच्या सेटवर परतणार असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानच्या ट्विटर फॅन पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा व्हिलचेअरवर बसलेला दिसत आहे.

दुसरीकडे सलमान खान सुद्धा बिग बॉसपासून स्वतःची सुटका करून घेण्याच्या मागे आहे. ज्या दिवशी मेकर्सनी हा शो आणखी 5 आठवडे वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलमाननं घरातील सदस्यांना शुभेच्छा देत यानंतर तो या शोमध्ये दिसणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सलमानची जागा फराह खान घेणार असल्याचं बोललं जात आहे. तर रणदीप हुड्डा बद्दल बोलायचं तर त्याच्याकडे सध्या प्रचंड काम आहे. राधे व्यतिरिक्त तो इम्तियाज अली आणि मीरा नायरसोबत काम करत आहे.

रणबीर कपूरने सोडलेल्या या 5 सिनेमांमुळे सुपरस्टार झाला रणवीर सिंह

पती रणवीरसोबत चित्रपट करणार नाही, दीपिकानं सांगितलं कारण

Published by: Megha Jethe
First published: December 4, 2019, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading