इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

ऑस्ट्रेलियामधून एमबीए केल्यानंतर हुड्डा भारतात आल्यानंतर एका विमान कंपनीत काम करत होता. इथे त्याला पहिल्यांदा मॉडेलिंगची संधी मिळाली.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट- बॉलिवूडचा रफ अँड टफ हिरो रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) आज वाढदिवस. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. रणदीपला त्याचा पहिला सिनेमा फार फिल्मी अंदाजात मिळाला होता. ऑस्ट्रेलियामधून एमबीए केल्यानंतर हुड्डा भारतात आल्यानंतर एका विमान कंपनीत काम करत होता. इथे त्याला पहिल्यांदा मॉडेलिंगची संधी मिळाली. यानंतर रणदीपने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा विचार केला. मॉडेलिंगसोबतच त्याने दिल्लीतील थिएटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.

रणदीप आपल्या प्रयोगांसाठी जीव तोडून मेहनत घ्यायचा. या दरम्यान दिग्दर्शिका मीरा नायर (Mira Nair) ची नजर त्याच्यावर पडली. मीरा यांना रणदीपचं काम प्रचंड आवडलं. त्यांनी 2001 मधील मॉन्सून वेडिंग सिनेमाची ऑफर त्याला दिली. त्याच्या करिअरला चांगले दिवस 2010 मध्ये आलेल्या वन्स अपॉन टाइम इन मुंबई सिनेमामुळे आले. रणदीपच्या मते, या सिनेमानंतर त्याला एकामागोमाग एक सिनेमे मिळायला सुरुवात केली.

यानंतर हायवे (2014), सरबजीत (2016), सुलतान (2016), बागी (2018) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. कॉन्ट्रोव्हर्सी आणि अफेअरमुळेही त्याच नाव चर्चेत आलं होतं. आतापर्यंत त्याचं नाव अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंह आणि लीसा हेडन यांच्याशी जोडलं गेलं आहे. याशिवाय 2006 ते 2008 मध्ये त्याने सुष्मिता सेनला डेट केलं होतं. यानंतर नीतू चंद्रासोबतही तो रिलेशनशिपमध्ये होता.

अफेअरशिवाय रणदीप त्याच्या बोल्ड सीनमुळेही चर्चेत राहतो. दोनवेळा तर त्याच्या सिनेमाचे इंटिमेट सीन लीक झाले होते. प्रसिद्ध छायाचित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर रंगरसिया सिनेमातील अनेक बोल्ड सीन लीक झाले होते. या सीनमुळे हा सिनेमा तुफान चर्चेत आला होता. या सिनेमाशिवाय त्याच्या साहब बीवी और गँगस्टर सिनेमातील अभिनेत्री माही गिलसोबतचाही बोल्ड सीन लीक झाला होता.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या