मुंबई, 28 जून- बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर निर्माता अजय सिंहने काही दिवसांपूर्वी २.५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. अजयने केलेल्या आरोपांनुसार, अमिषा त्याला रांची येथे भेटली होती आणि तिच्या प्रोडक्शन हाउसच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी अजयने तिला २.५ कोटी रुपये दिले होते. निर्मात्याच्या दाव्यानुसार, अमिषाने हा पैसा तिच्या प्रोडक्शन हाउसवर लावला होता आणि नफा तसेच व्याजासोबतच दिलेले पैसे परत करण्याचं ठरलं होतं.
ठरलेल्या वेळेला अमिषा आणि तिच्या पार्टनरने निर्मात्याला पैशांचा चेक दिला. मात्र तो चेक बाउंस झाला. या प्रकरणी अजयने अमिषाशी चर्चा केली असता तिने पैसे परत करण्यास नकार दिला. यानंतरच अजय सिंहने न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि अमिषाला कायदेशीर नोटीस पाठवली.
कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का
यानंतर रांची न्यायालयाने अमिषा पटेलला समन्स पाठवला असून ८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. अजय सिंह हे माही गिल आणि जिमी शेरगिल स्टारर फॅमिली ऑफ ठाकुर गंज या सिनेमाचे निर्माते आहेत. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर साहेब बीवी और गँगस्टर या सिनेमानंतर दुसऱ्यांदा माही आणि जिमी एकत्र काम करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी
करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा