मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir-Alia Wedding: आज आलिया-रणबीर बांधणार लग्नगाठ, या ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

Ranbir-Alia Wedding: आज आलिया-रणबीर बांधणार लग्नगाठ, या ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

बॉलिवूड   (Bollywood)  चॉकलेट बॉय रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)  आज लग्नगाठ   (Wedding)  बांधणार आहेत.हा बहुचर्चित विवाहसोहळा आज पार पडणार आहे. आलिया आणि रणबीरचे चाहतेच नव्हे तर दोन्ही कुटुंबही या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 एप्रिल-  बॉलिवूड   (Bollywood)  चॉकलेट बॉय रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)  आज लग्नगाठ   (Wedding)  बांधणार आहेत.हा बहुचर्चित विवाहसोहळा आज पार पडणार आहे. आलिया आणि रणबीरचे चाहतेच नव्हे तर दोन्ही कुटुंबही या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाच्या तारखेबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. पण 13 एप्रिलच्या रात्री वराची अर्थातच रणबीरची आई नीतू कपूर   (Neetu Kapoor)  आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी लग्न आज होणार असल्याचा खुलासा केला आहे.

आलिया भट्टच्या हातावर रणबीर कपूरच्या प्रेमाचा रंग चढला आहे. अर्थातच काल मेहंदी समारंभ पार पडला आहे. 13 एप्रिल रोजी एक विशेष पूजा आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंबासह निवडक बॉलिवूड लोक उपस्थित होते. त्यांनतर आज म्हणजेच 14 एप्रिलला सकाळी हळद, चुडा सोहळा होणार असून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा सुरू होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी 9 वाजल्यापासून हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कुटुंबातील सदस्य वधू आणि वर दोघांना हळद लावतील. यानंतर आलियाला चुडा घातला जाईल. हे विधी पूर्ण झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू होईल.रणबीर कपूरची वरात मुंबईतील चेंबूर येथील कृष्णा राज बंगला (आरके हाऊस) ते टोनी पाली हिल परिसरात असलेल्या आलियाच्या 'वास्तू'पर्यंत जाईल. संपूर्ण कपूर कुटुंब वास्तूमध्ये येणार. हे दोन्ही बंगले एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत. येथे लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील. कपूर कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे, ज्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

रणबीर-आलियाच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित असणार आहेत. लग्नानंतर त्यांनी एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचणार आहेत. 17 एप्रिल रोजी हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यामध्ये इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रणे पाठवली जाणार आहेत.बॉलिवूडच्या या बहुचर्चित लग्नासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. 14 एप्रिल अर्थातच आज सर्वकाही व्यवस्थित पार पडावं यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor