मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीरच्या एक्स दीपिका-कतरिनाने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पाहून नेटकरी म्हणाले.....

रणबीरच्या एक्स दीपिका-कतरिनाने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पाहून नेटकरी म्हणाले.....

 बॉलिवूडचे   (Bollywood)  दोन प्रसिद्ध स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding)  अडकले आहेत. दोघांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचे काही जवळचे मित्रही उपस्थित होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 एप्रिल-  बॉलिवूडचे   (Bollywood)  दोन प्रसिद्ध स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding)  अडकले आहेत. दोघांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांचे काही जवळचे मित्रही उपस्थित होते. या दोघांच्या लग्नापासूनच त्यांचे चाहते त्यांच्या पहिल्या झलकची वाट पाहात होते. जे आता समोर आले आहे.त्यांनतर या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र यामध्ये दोन व्यक्तींच्या शुभेच्छां अशा आहेत ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या शुभेच्छा इतर कोणाच्या नसून अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि दीपिका पादुकोण  (Deepika Padukone)  यांच्या आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात आले होते. कारण रणबीरला त्याचे लग्न जास्त लाइमलाईटमध्ये येऊ नये असे वाटत होते.परंतु तरीसुद्धा या दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. रणबीर कपूर सोशल मीडिया पासून दूर असल्याने लग्नानंतर आलिया भट्टने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत सर्वांना आपल्या नव्या प्रवासाची पहिली झलक दाखवली आहे. हे फोटो समोर येताच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. फक्त चाहतेच नव्हे तर कलाकारसुद्धा या दोघांवर आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

दरम्यान आलिया भट्टच्या या फोटोंवर अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोणनेसुद्धा प्रेमाचा वर्षाव केला आहे. या दोघांनी शुभेच्छा देताच सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. कारण या दोन्ही अभिनेत्रींनीं रणबीर कपूरला अनेक वर्षे डेट केलं आहे. सुरुवातीला रणबीर कपूर अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता, ते दोघे लग्नही करणार होते मात्र अचानक ब्रेकअप करत या दोघांनी धक्का दिला होता. त्यांनतर रणबीर 'अजब प्रेम कि गजब कहाणी' चित्रपटाच्या सेटवर कतरिनाच्या प्रेमात पडला होता. या दोघांनीसुद्धा अनेक वर्षे एकेमकांना देत केलं आहे. त्यांनतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे नेटकरी त्यांना रणबीरची एक्स म्हणत आहेत.

कतरिनाने शुभेच्छा देत म्हटलं आहे, 'तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. सर्व प्रेम आणि आनंद तुमच्यासाठी'. तर दुसरीकडे दीपिका पादुकोणने शुभेच्छा देत म्हटल आहे, ''तुम्हा दोघांना आयुष्यभरासाठी प्रेम,प्रकाश आणि हास्य'. या दोघीनीं आलिया भट्टच्या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा देताच सर्वांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Deepika padukone, Katrina kaif, Ranbir kapoor