मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सांवरिया नाही तर ही होती रणबीर कपूरची पहिली फिल्म; ऑस्करसाठीही मिळालं होतं नामांकन

सांवरिया नाही तर ही होती रणबीर कपूरची पहिली फिल्म; ऑस्करसाठीही मिळालं होतं नामांकन

बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वीच ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या एका फिल्ममध्ये रणबीर कपूरने (Ranbir kapoor film) काम केलं आहे.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वीच ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या एका फिल्ममध्ये रणबीर कपूरने (Ranbir kapoor film) काम केलं आहे.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वीच ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या एका फिल्ममध्ये रणबीर कपूरने (Ranbir kapoor film) काम केलं आहे.

मुंबई, 06 मे : अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) पहिली फिल्म कोणती विचारलं तर साहजिकच तुमच्या तोंडात पहिलं नाव येईल ते सांवरिया (Saawariya). पण तुम्हाला माहिती आहे का ही रणबीरची पहिली फिल्म (Ranbir Kapoor first film) नाही. तर रणबीरची पहिली फिल्म वेगळीच आहे आणि त्या फिल्मला ऑस्करसाठी नामांकनही मिळालं होतं आणि ही फिल्म म्हणजे (Karma).

2007 मध्ये संजय लिला भन्साळी यांच्या सांवरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वी ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या एका लघुपटात (Shortfilm) रणबीरने (Ranbir kapoor shortfilm) काम केलं आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माता बी.आर. चोप्रा यांचा नातू अभय चोप्रा दिग्दर्शित कर्मा (Karma) या लघुपटात सर्वप्रथम रणबीरने भूमिका साकारली होती. 2004 मध्ये रणबीर एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवत होता, तेव्हा या लघुपटाचं चित्रीकरण झालं होतं. या लघुपटाला स्टुडंट ऑस्करसाठी (Student Oscar) नामांकन मिळालं होतं.

" isDesktop="true" id="547843" >

हा लघुपटाचे कथानक काल्पनिक आणि भारतात भांडवलशाही विरोधी क्रांतीवर आधारित होते. जेव्हा जेलरला त्याच्या मुलास देहदंडाची शिक्षा द्यावी लागते, तेव्हा त्याच्या मनातील कोंडी, भावना याचं चित्रण या लघुपटात करण्यात आलं होतं. या लघुपटात रणबीर कपूरसोबत जेलरची प्रमुख भूमिका बॉलिवूड अभिनेते शरद सक्सेना (Sharat Saxena) यांनी केली होती. त्याचबरोबर मिलिंद जोशी आणि सुशोवन बॅनर्जी हे देखील मुख्य भूमिकेत होते. हा लघुपट 5 मे रोजी बांद्रा फिल्म फेस्टिव्हल (Bandra Film Festival) या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हे वाचा - मधुरा वेलणकर झळकणार थ्रीलर वेबसिरीजमध्ये, फर्स्ट लुक आला समोर...

या लघुपटाच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी सांगताना अभय चोप्रा म्हणाले, या लघुपटाची कथा काल्पनिक असली तरी वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी आहे. हेतल पारेख यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केल्याच्या आरोपाखाली धनंजय चॅटर्जीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबत देशात खूपच चर्चा झाली होती. त्यावेळी ऐकलेल्या चर्चा, उपलब्ध माहितीवरून मला या लघुपटाचं मध्यवर्ती कथानक सुचलं. फाशीची शिक्षा हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. एखाद्या गुन्ह्याकडे असंख्य मते आणि मुखपृष्ठ कथांच्या माध्यामातून राष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत असतात, असं अभय यांनी सांगितलं.

यावेळी अभय चोप्रा यांनी रणबीरसोबत दिग्दर्शक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला. रणबीर हा एक कष्टाळू आणि प्रयत्नशील अभिनेता आहे. अभिनय त्याच्या रक्तात आहे, असं अभय चोप्रा यांनी नमूद केलं. बांद्रा फिल्म फेस्टीव्हलमध्ये अनेक प्रेक्षकांनी या लघुपटाला पसंती दिली. त्यामुळे विशेष आनंद वाटतो, असं त्यांनी बॉलिवूड हंगामाशी (Bollywood Hungama) बोलताना सांगितलं.

हे वाचा - 'मी आणि अंकुश होतो जुळे भाऊ', पाहा भरत जाधवच्या पहिल्या चित्रपटाचा भन्नाट किस्सा

बांद्रा फिल्म फेस्टिव्हल हा फिल्मकारवा आणि युट्युब यांचा सहयोगात्मक उपक्रम आहे. या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, उत्तम कलाकार, तंत्रज्ञांना निर्मात्यांसमोर आणणं आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान दिलं जातं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Entertainment, Ranbir kapoor