पत्नी, मुलासोबत ऋषींनी काढला फोटो, अनेक प्रश्नांचं उत्तर देतो हा फोटो

पत्नी, मुलासोबत ऋषींनी काढला फोटो, अनेक प्रश्नांचं उत्तर देतो हा फोटो

या परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये तिघंही फार आनंदी दिसत आहेत. नीतू सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी यांच्या तब्येतीची माहिती शेअर करत असतात.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल- बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ते उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले. त्यांच्यासोबत पत्नी नीतू कपूरही न्यूयॉर्कला गेल्या. मुलगा रणबीर कपूर अनेकदा वडिलांना भेटायला न्यूयॉर्कला जातो. कपूर कुटुंबातील सदस्य आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना वेळ मिळेल तसा ऋषी यांना भेटायला न्यूयॉर्कला जातात. स्वतः नीतूही ऋषी यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

नुकतेच नीतू यांनी ऋषी आणि रणबीरसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये तिघंही हसताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना नीतू यांनी लिहिले की, ‘कठीण प्रसंगांमध्येही तुम्हाला चांगलं वाटतं जेव्हा सकारात्मकता, आनंद, प्रेम तुमच्यासोबत असतो.’ नीतू यांच्या या पोस्टवर आलिया भट्ट आणि सोनी राजदान यांनी हार्टवालं इमोजी शेअर केलं.

या परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये तिघंही फार आनंदी दिसत आहेत. नीतू सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी यांच्या तब्येतीची माहिती शेअर करत असतात. ते लवकरच भारतात परततील अशी अपेक्षा त्यांचे चाहते करत आहेत.

एका पुरस्कार सोहळ्यात रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कार घेताना रणबीर म्हणाला की, ‘हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो. ते सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. जेव्हाही मी त्यांच्यासोबत गप्पा मारतो ते फक्त सिनेमांबद्दलच बोलतात. नवीन आलेल्या सिनेमांबद्दल ते विचारतात. ते उपचार संपवून भारतात आल्यानंतर त्यांना कोणी सिनेमात काम देईल का याचाही ते विचार करतात.’

यावर्षी रणबीर- आलियाच्या लग्नाच्या चर्चा आहेत. दोघांच्या लवकर लग्नाचं कारण ऋषी यांची तब्येत म्हटली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीरने आता आयुष्यात सेटल व्हावं असी ऋषी यांची इच्छा आहे. भारतात परतल्यानंतर सर्वात आधी ते रणबीरच्या लग्नाचा विचार करणार आहेत.

VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

First published: April 5, 2019, 7:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading