मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: रणबीर घेतोय 'अनुपमा' फेम अभिनेत्रीकडून बेस्ट बाबा बनण्याचं ट्रेनिंग!

VIDEO: रणबीर घेतोय 'अनुपमा' फेम अभिनेत्रीकडून बेस्ट बाबा बनण्याचं ट्रेनिंग!

(Alia Bhatt announces pregnancy with Ranbir Kapoor) आलिया आणि रणबीर यांनी दिलेल्या गुड न्यूजनंतर सध्या रणबीर कपूर वडिलांची जबाबदारी उचलण्याआधी बरीच मेहनत घेताना दिसत आहे.

(Alia Bhatt announces pregnancy with Ranbir Kapoor) आलिया आणि रणबीर यांनी दिलेल्या गुड न्यूजनंतर सध्या रणबीर कपूर वडिलांची जबाबदारी उचलण्याआधी बरीच मेहनत घेताना दिसत आहे.

(Alia Bhatt announces pregnancy with Ranbir Kapoor) आलिया आणि रणबीर यांनी दिलेल्या गुड न्यूजनंतर सध्या रणबीर कपूर वडिलांची जबाबदारी उचलण्याआधी बरीच मेहनत घेताना दिसत आहे.

मुंबई 8 जुलै: बॉलिवूडचा कूल कपूर स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor father to be) बाबा होणार ही बातमी समोर आल्यापासून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. लाखो चाहत्यांनी या नवीन जोडप्याला दिलेल्या गुड न्यूजबद्दल शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. सध्या वडील होणं हे रणबीरने चांगलंच मनावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. स्टार प्लसवरील एका प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीकडून सध्या रणबीर (Ranbir Kapoor) चांगला बाबा होण्याचं ट्रेनिंग घेताना दिसत आहे.

स्टार प्लस वर ‘अनुपमा’ मालिकेचा (Anupama serial) खूप बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. अनुपमा मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या रणबीर कपूरला चांगले वडील होण्यासाठी काही टिप्स देताना दिसत आहे.

रणबीर आणि रुपाली (Ranbir Kapoor & Rupali Ganguly) यांचा एक व्हिडिओ सध्या बराच viral होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली रणबीरला बाळाला झोपवण्यापासून ते दूध पाजेपर्यंत गोष्टी कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन करताना दिसत आहे. ‘तुमच्या हृदयाचा एक भाग जेव्हा बाहेर येऊन चालू फिरू लागतो ते तुमचं मूल असतं’ असं रुपाली त्याला सांगते. रणबीर सुद्धा जबाबदार पित्यासारखा वेगवेगळी कामं करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओवर काही संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी रणबीरचं कौतुक केलं आहे तर काहींनी या गोष्टीला सुद्धा प्रमोशन स्ट्रॅटेजीचं नाव दिल्याचं पाहायला मिळत आहे. एक युजर असं लिहितो “जसं की सगळी कामं हाच करणार आहे, अशी कामं करायला लाख रुपये देऊन नॅनी ठेवत असतील हे” तर एक युजर म्हणतो,

हे ही वाचा- Koffee With Karan 7: अशी झाली आलिया रणबीरची दुल्हनिया, केलं होतं हटके स्टाइल प्रपोज?

“यांना सगळीकडे फक्त मार्केटिंग दिसतं कशातूनही टीआरपी काढणार” काहींनी रणबीरला पाठिंबा देत असं लिहिलं आहे, “त्याला अशा अवतारात बघणं किती छान आहे, जरी हे प्रमोशन असेल तरी त्याचा हा अंदाज किती छान आहे.”

रणबीर स्टार प्लसवरील कार्यक्रमात समशेरा सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्यादरम्यान रुपाली गांगुली आणि रणबीर यांनी हे क्षण सोबत घालवल्याचं पाहायला मिळत आहे. रुपालीने समशेरा स्टार सोबतचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत. या व्हिडिओतून रणबीरने चांगले बाबा होण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Father, Ranbir kapoor