मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूरची तेलुगू पाहून राजामौलींनी केलं असं काही.....VIDEO होतोय तुफान VIRAL

रणबीर कपूरची तेलुगू पाहून राजामौलींनी केलं असं काही.....VIDEO होतोय तुफान VIRAL

 बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच रणबीर-आलियासोबतच ब्रह्मास्त्रची टीम चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी हैद्राबादला पोहोचली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच रणबीर-आलियासोबतच ब्रह्मास्त्रची टीम चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी हैद्राबादला पोहोचली होती. या कार्यक्रमादरम्यान रणबीर कपूरने चाहत्यांसोबत चक्क तेलुगूत संवाद साधला. अभिनेत्याची तेलुगू पाहून एसएस राजामौलींनी असं काही केलं की, हा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे. रणबीर कपूर आणि एसएस राजामौली यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवर युजर्स विविध प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

पापाराझी विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा रणबीर कपूरचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता ब्लॅक लूकमध्ये एकदम डॅशिंग दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरने काळी जीन्स, काळा टी-शर्ट आणि काळं जॅकेट घातलं आहे. रणबीर व्यतिरिक्त करण जोहर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता रणबीर कपूर चक्क तेलुगूमध्ये संवाद साधताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरने तेलुगुमध्ये 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट कसा आहे याबाबत सांगितलं. यासोबतच त्याने हैदराबादमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत आपल्या चाहत्यांना सांगितलं की, चित्रपटाचा पुढचा भाग येईपर्यंत तो त्याच्या तेलुगूमध्ये आणखी सुधारणा करेल. अभिनेत्याचा हा प्रयत्न पाहून साऊथमधील त्याचे चाहते त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत.

(हे वाचा:VIDEO: आलिया भट्टने बनवला खास शरारा ड्रेस; बाळासाठी लिहलाय अनोखा मेसेज )

रणबीरच्या या प्रयत्नाला सगळ्यांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. त्याचवेळी एसएस राजामौली यांनी भावुक होत अभिनेत्याला मिठी मारली. त्यांना रणबीरचा हा अंदाज फारच भावला आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटात आलिया-रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयसुद्धा आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांचासुद्धा कॅमिओ असणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor