रणबीरनं आलियासाठी उचललं मोठं पाऊल

रणबीरनं आलियासाठी उचललं मोठं पाऊल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या रिलेशनशिपबद्दल स्वत:हून काही बोलत नाहीत. तरीही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंग वेळी त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच कळलं आणि जाणवलं.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या रिलेशनशिपबद्दल स्वत:हून काही बोलत नाहीत. तरीही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंग वेळी त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच कळलं आणि जाणवलं.

आलिया आणि रणबीर दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांच्या बाॅडी लँग्वेजमधून ते चांगलंच जाणवतंही. आता रणबीरनं अशी एक गोष्ट केलीय ज्यामुळे त्यांच्या नात्यांवर शिक्कामोर्तब होतंय. रणबीरचा फॅमिली चॅट ग्रुप आहे. त्यात त्यानं आलियाला अॅड केलंय. त्या ग्रुपमध्ये ऋषि कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि रीमा जैन आहेत.

आलिया भट्ट सध्या कलंक सिनेमाचं शूटिंग करतेय. दीपवीरच्या लग्नाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट काही आले नव्हते. असं म्हणतात ते ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते.

आता त्यांनी ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनचा प्लॅन केलाय. दोघं एकत्रच हे सेलिब्रेशन करणार आहेत. दोघांच्या रिलेशनशिपमुळे भट्ट आणि कपूर दोन्ही कुटुंबं खूप खूश आहेत.

ऋषी कपूर आणि नितू कपूर अमेरिकेत आहेत. तिथे ऋषी कपूरवर उपचार सुरू आहे.दोघंही सुट्टी घेऊन तिथे जाणार आहेत. ऋषी कपूरसोबत वेळ घालवून ते सेलिब्रेशनही करतील. आलिया आपला जास्तीत जास्त वेळ रणबीरच्या आई-वडिलांबरोबर घालवते. दोघांनाही ती खूप प्रिय आहे.

मध्यंतरी, 'नितूला आवडते, मला आवडते, रणबीरला आवडते, समजलं?' काही दिवसांपूर्वी ऋषी कपूरनं म्हटलं होतं. त्यानंतर सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना आलिया-रणबीरबद्दल जी चर्चा  किंवा अफवा आहे त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी माझ्या मुलीशी थेट बोलू शकते.'

त्या पुढे म्हणाल्या, ' माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूपच चांगलं आहे. मला अफवांकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी थेट बोलू शकते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहीत असतं. शेवटी ते तिचं जीवन आहे. तिला हवं तसं जगू द्यायला हवं. तिचे निर्णय ती स्वत: घेते.'

काही दिवसांपूर्वी रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

'बिग बाॅस 10'ची स्पर्धक लोपामुद्राच्या बिकनीतल्या फोटोजनी फॅन्सना केलं घायाळ

First published: December 18, 2018, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading