मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Kapoor: कपूर खानदानात 10 वी पास करणारा रणबीर एकमेव मुलगा, काय आहे ही भानगड?

Ranbir Kapoor: कपूर खानदानात 10 वी पास करणारा रणबीर एकमेव मुलगा, काय आहे ही भानगड?

बॉलिवूडच्या रॉकस्टार हिरो रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ssc marks) दहावीत किती टक्के मिळाले माहित आहे का?

बॉलिवूडच्या रॉकस्टार हिरो रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ssc marks) दहावीत किती टक्के मिळाले माहित आहे का?

बॉलिवूडच्या रॉकस्टार हिरो रणबीर कपूरला (Ranbir Kapoor ssc marks) दहावीत किती टक्के मिळाले माहित आहे का?

  मुंबई 10 जुलै: बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचं मोठं नाव आहे. सध्या कपूर खानदानाचा चिराग रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) वेगवेगळ्या सुपरहिट सिनेमांतून आजच्या घडीचा मोठा स्टार बनला आहे. रणबीर येत्या काळात ‘समशेरा’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याला त्याच्या दहावीच्या निकालाबद्दल(Ranbir Kapoor 10th result) विचारणा झाली होती. तुम्हाला माहित आहे का? कपूर फॅमिलीमधला रणबीर हा एकमेव मुलगा आहे ज्याने दहावी पास केली आहे. डॉली सिंग या प्रसिद्ध influencer सोबत झालेल्या मुलाखतीत डॉलीने रणबीरला काही नॉर्मल प्रश्न विचारले होते. तेव्हा तिने त्याला दहावीत किती मार्क मिळाले होते असं विचारलं. त्यावर रणबीरने उत्तर दिल, “मला दहावीत 53% मिळाले होते. माझा निकाल आल्यावर माझ्या फॅमिलीने जंगी सेलिब्रेशन केलं होतं कारण कोणालाच अपेक्षा नव्हती की मी पास होणारे की नाही. माझ्या कुटुंबात दहावी पस करणारा मी पहिला मुलगा आहे.” कपूर फॅमिलीतील एक एक मेंबर अभिनयाच्या बाबतीत सरस आहेत. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अनेकांबद्दल सामान्य प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते. ते ही सामान्य व्यक्तींसारखे राहतात का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडत असतात. एका मुलाखतीत रणबीरने अशाच काही नॉर्मल प्रश्नांची उत्तरं दिली. रणबीर सध्या फिल्मचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पण नुकतंच त्याने आलिया भट्टला एअरपोर्टवर येऊन सरप्राईज सुद्धा दिलं. आलियाने आई होण्याची बातमी दिल्यानंतर ती पहिल्यांदाच मुंबईत परतली. त्यावेळी विमानतळावर येऊन रणबीरने तिला सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळालं. हे ही वाचा- Alia Bhatt Baby Bump : रणबीरला पाहताच मोठ्याने 'बेबी' ओरडली अन्..., पाहा VIDEO "आलियाने धावत जाऊन रणबीरला मिठी मारल्याचं सुद्धा कॅमेरात कैद झालं आहे. रणबीर सध्या बेस्ट बाबा होण्याचं ट्रेनिंग घेताना सुद्धा दिसत आहे. एका रिऍलिटी शोमध्ये प्रमोशन करताना त्याने प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीकडून उत्तम वडील कसं व्हावं? बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल टिप्स घेतल्या.
  View this post on Instagram

  A post shared by Dolly Singh (@dollysingh)

  रणबीर जवळपास चार वर्षांनी लागोपाठ वेगवेगळ्या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ता जुलै महिन्यात समशेरा तर सप्टेंबरमध्ये ब्रह्मास्त्र या बिग बजेट सिनेमात रणबीर दिसून येईल सध्या त्याच्या आणि आलियाच्या लव्हस्टोरीबद्दल सुद्धा बरीच चर्चा होत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actor, Exam result, Ranbir kapoor, Ssc board

  पुढील बातम्या