मुंबई, 01 जानेवारी : अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नववर्षाचं स्वागत धमाकेदार स्टाइलमध्ये केलं आहे. त्याने 12 वाजून 1 मिनिटांनी त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली. अॅनिमल या नव्या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. चित्रपटात त्याची महत्वाची भूमिका असेल. रणवीर त्याच्या नव्या सिनेमामुळे खूपच उत्साहात दिसत आहे. अॅनिमलचा टीझर प्रेक्षकांना अतिशय आवडत आहे.
रणबीर सोबत या सिनेमामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), परिणीति चोप्रा (Pariniti Chopra) आणि बॉबी देओल (Bobby Deol) सुद्धा झळकणार आहेत. अनिल कपूर आणि बॉबी देओलनेसुद्धा या सिनेमाचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अॅनिमल सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. टीझरमध्ये फक्त रणबीर कपूरचा व्हॉइस ओव्हर येत आहे. त्यात तो आपल्या वडिलांना म्हणतोय, ‘बाबा पुढच्या जन्मी तुम्ही माझा मुलगा म्हणून जन्म घ्या मग बघा मी तुमच्यावर किती प्रेम करतो. मग त्याच्या पुढच्या जन्मी पुन्हा मी तुमचा मुलगा होईन तुम्हाला लक्षात येतं आहे ना मी काय म्हणतोय?’ या चित्रपटात अनिल कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हा एक अॅक्शन-थ्रिलर सिनेमा आहे.
बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब असलेल्या रणबीरला लवकरात लवकर स्क्रीनवर पाहण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्राच्या आधी सारा अली खानचं नाव निश्चित झालं होतं पण काही कारणामुळे तिने हा चित्रपट केला नाही. संदीप रेड्डी यांनी आपला भाऊ प्रणय रेड्डी यांच्याबरोबर भद्रकाली पिक्चर्स नावाची एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली असून ही कंपनी टी सीरिजसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.