मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'गंगूबाई काठियावाडी'साठी आलियाला नक्कीच मिळणार राष्ट्रीय पुरस्कार, रणबीरने केली भविष्यवाणी

'गंगूबाई काठियावाडी'साठी आलियाला नक्कीच मिळणार राष्ट्रीय पुरस्कार, रणबीरने केली भविष्यवाणी

आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होत आहे.

आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होत आहे.

आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होत आहे.

     मुंबई, 14ऑक्टोबर-  अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट सध्या एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. दोघांच्या कृतींमधून हे अनेकदा समोरही आलेलं आहे. कुठल्याही कार्यक्रमाला जाताना देखील दोघं सोबतच दिसतात. सध्या आलिया तिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळं चर्चेत आहे. पुढील वर्षी 6 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणबीर कपूरनं आलियाबाबत एक मोठ वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या वर्षात आलियाला अभिनयासाठी नॅशनल अवॉर्ड (National Award) मिळणार असल्याचं रणबीरच म्हणणं आहे. फिल्मी बीटनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडीनिमित्त आलिया भट (Alia Bhatt) पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर डॉर्क कॅरेक्टर साकारणार आहे. हा चित्रपट 60 च्या दशकातील मुंबईतील महिला माफिया गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे. गंगूबाई मुंबईतील कामाठीपुरामध्ये कोठा चालवत होती. या चित्रपटाची पटकथा हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन लिहिली गेली आहे. अभिनेता अजय देवगण देखील या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. अजय, गंगूबाईला बहीण मानणाऱ्या करीम लालाची भूमिका साकारणार आहे.

    चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून इंडस्ट्रीमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. यात आलियाचा ब्रॉयफ्रेंड रणबीर कपूरदेखील मागे नाही. रणबीर अनेकदा आलिया आणि तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. संजय लीला भन्साळींनी (Sanjay Leela Bhansali) आलियाकडून सर्वोत्तम काम करून घेतलं असल्याचं रणबीर म्हणाला आहे. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, आलियाला गंगूबाईच्या भूमिकेसाठी नॅशनल अवार्ड देखील मिळेल असा दावा रणबीरनं केला आहे. विशेष म्हणजे, सध्या नात्यात असलेले रणबीर आणि आलिया पहिल्यांदा भन्साळींच्या चित्रिकरणासाठीच भेटले होते. दोघांनी बालिका वधू नावाच्या एका चित्रपटासाठी टेस्ट शूट केल्याचं सांगितलं जातं. तेव्हा आलिया 11 वर्षांची तर रणबीर 20 वर्षांचा होता.

    (हे वाचा:बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL)

    संजय लीला भन्साळींसोबत काम करण्यासाठी आलियाला मोठी प्रतीक्षा करावी लागली. ब्लॅक चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणीच्या रोलसाठी आलियानं ऑडिशन दिली होती. मात्र, तिच्या अभिनयानं प्रभावित झालेल्या भन्साळींना तिला लहानशा रोलमधून इंडस्ट्रीत आणण्याची इच्छा झाली नाही. इंडस्ट्रीत आल्यानंतर आलियानं भन्साळींचा 'इंशाल्लाह' हा चित्रपट साईन केला होता मात्र, सलमाननं यातून काढता पाय घेतल्यानं हा चित्रपट बारगळला. या चित्रपटाच्या नादात आलियानं आमीर खानसोबतचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट सुद्धा नाकारला होता. आलियानं भन्साळींना डेट्स देखील दिलेल्या होत्या त्यांचा वापर करून भन्साळींनी गंगूबाई काठियावाडी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. संजय यांचे चित्रपट त्यांच्या सेट डिझाईन आणि कला दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गंगूबाई काठियावाडीमध्ये ते काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

    (हे वाचा:Aryan Khan case: आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खानची प्रकृती बिघडली)

    आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होत आहे. याच दिवशी एस एस राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट देखील रिलीज होत आहे. गंमत म्हणजे दोन्ही चित्रपटांमध्ये आलिया भट मुख्य भूमिकेत असून अजय देवगण देखील दोन्ही चित्रपटांमध्ये आहे.

    First published:

    Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor