S M L

...आणि रणबीरला मागावी लागली माफी

फॅमिली गेट टूगेदरचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. पण यावेळी किस्सा असा घडला की, ऋषी साहेब त्यांच्या चाहत्यांवर चिडले आणि रणबीरला माफी मागावी लागली.

Sachin Salve | Updated On: Jan 12, 2018 02:18 PM IST

...आणि रणबीरला मागावी लागली माफी

12 जानेवारी : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या कुटुंबासोबत डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्या या फॅमिली गेट टूगेदरचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. पण यावेळी किस्सा असा घडला की, ऋषी साहेब त्यांच्या चाहत्यांवर चिडले आणि रणबीरला माफी मागावी लागली.

ते झालं असं की, कपूर कुटुंबीय हॉटेलमध्ये जेवायला गेले असता एका महिला चाहतीनं कपूर कुटुंबीयांसोबत सेल्फी काढण्यासाठी विचारलं. रणबीर आणि नितू सिंग यांनी तिच्यासोबत फोटो काढला पण ऋषी कपूर यांनी फोटो काढण्यास नकार दिला.

जेवून झाल्यानंतर ते गाडीत बसण्यासाठी निघाले पण ती महिला पुन्हा ऋषी कपूर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आली पण तेव्हाही ऋषी कपूर यांनी तिला नकार दिला. तेव्हा ती महिला चिडून ऋषी यांना म्हणाली की 'हाऊ रुड'. मग काय असं म्हटल्यावर साहेब चिडले आणि त्यांनी तिला चांगलच सुनावलं. पण मग या सगळ्यावर रणबीर पुढे आला. त्याने त्या महिलेला वाचवलं तिची माफी मागितली. ऋषी यांना समजवलं आणि गाडीत बसवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 02:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close