Home /News /entertainment /

Ranbir Kapoor wife: बाबो! रणबीर कपूरचं याआधी सुद्धा झालं आहे एक लग्न? कोण आहे पहिली बायको?

Ranbir Kapoor wife: बाबो! रणबीर कपूरचं याआधी सुद्धा झालं आहे एक लग्न? कोण आहे पहिली बायको?

रणबीरच्या (Ranbir Kapoor) घरी सध्या नव्या पाहुण्याचं आगमन होणार अशी बातमी नुकतीच आली आहे. त्याच्या आयुष्यात सगळं काही आलबेल असताना अचानक त्याच्या ‘पहिल्या बायको’ बद्दल चर्चा होताना दिसत आहे. रणबीरचं याआधी सुद्धा लग्न झालं आहे का? हे प्रकरण नेमकं काय आहे?

पुढे वाचा ...
  मुंबई 28 जून: बॉलिवूडमध्ये सध्या ज्या कपलच्या गुड न्यूजची चर्चा संपता संपत नाहीये ते कपल म्हणजे (Alia Bhatt announces pregnancy with Ranbir Kapoor) आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. आलियाने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातच गोड बातमी सल्याने उत्साह आणि उल्हासाची लहर सगळीकडे पसरली आहे. नव्याने नवरा झालेला रणबीर कपूर नव्याने बाबा व्हायला सुद्धा रेडी आहे. पण रणबीर कपूरचं याआधी सुद्धा लग्न झालं आहे अशी बातमी समोर येत आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor dating life) हा कायमच त्याच्या डेटिंग लाईफमुळे प्रकाशझोतात राहिला आहे. आधी कतरीना मग दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यावर या अभिनेत्याने आलिया भटला डेट करायला सुरवात केली. तब्ब्ल पाच वर्षांच्या डेटिंगनंतर या दोघांनी एप्रिल महिन्यात लग्न करायचा निर्णय घेतला तर आता रणबीर बाबा होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या डेटिंग आयुष्यामुळे हेडलाईनमध्ये असणाऱ्या रणबीरच खरंच याआधी सुद्धा लग्न झालं आहे (Ranbir Kapoor first wife) की ही एक मस्करी आहे? काय आहे नेमकं प्रकरण? रणबीर सध्या समशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. जुलै महिन्यात जरी चित्रपट येणार असला तरी कलाकारांनी एक महिना आधीच कंबर कसून प्रमोशन करायला सुरवात केली आहे. याच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याला त्याची craziest fan moment विचारण्यात आली तेव्हा त्याने हा खुलासा केला की, “मला एक खूप आश्चर्यचकित करणारा प्रसंग आठवतो. मी जेव्हा इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात एक मुलगी माझ्या घराजवळ आली होती. मी कधी तिला भेटलो नव्हतो पण मला आमच्या घरच्या वॉचमनकडून असं कळलं की ती एक पंडित घेऊन आली होती आणि तिने माझ्या घराच्या गेटशी लग्न केलं. माझ्या घराच्या गेटवर कुंकू आणि फुलं असं सगळं लावलेलं होतं. तर अशा अर्थाने मी अजून माझ्या पहिल्या बायकोला भेटलो नाहीये, पण कधीतरी भेटायला आवडेल.’ असं रणबीर हसतहसत सांगतो. आपल्या आवडीच्या कलाकारावर कोणी एवढा जीव ओवाळून टाकत असेल असं खतिचंच पाहायला मिळतं. आत्ता जरी हे गंमतशीर वाटत असलं तरी हे काहीसं भीतीदायक सुद्धा नक्कीच आहे. हे ही वाचा- Alia Bhatt pregnancy: 'मी एक स्त्री आहे पार्सल नाही'; माध्यमांच्या खोट्या बातम्यांवर भडकली आलिया
   रणबीरच्या वर्क फ्रंटवर आणि पर्सनल फ्रंटवर दोन्हीकडे सध्या बम्परमध्ये आनंदाची बरसात त्याच्यावर होत आहे. एकीकडे तो बाबा होत असल्याची खबर, एकीकडे समशेरा सिनेमाचा रिलीज आणि एकीकडे ब्रह्मास्त्र या ड्रीम प्रोजेक्टचे हळूहळू उलगडणारे पत्ते सगळंच सध्या आलबेल चालू आहे. आलियाच्या इन्स्याग्रम अकाउंटवरून तिने आई होत असल्याची बातमी नुकतीच शेअर केली. आणि त्यावर काही प्रसार माध्यमांच्या खोट्या माहितीचा समाचार घेत आज तिने नाराजी सुद्धा व्यक्त केली.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor, Wife and husband

  पुढील बातम्या